अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार अमेय धोपटकर यांना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार अमेय धोपटकर यांना जाहीर
अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार अमेय धोपटकर यांना जाहीर

अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार अमेय धोपटकर यांना जाहीर

sakal_logo
By

rat३१p१.jpg ः
०६०५९
अमेय धोपटकर
-------------
अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार अमेय धोपटकरांना जाहीर
बालगंधर्व संगीत रसिक मंडळः रत्नागिरीकरांकडून अभिनंदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ः पुण्यातील बालगंधर्व-संगीत रसिक मंडळाचा यावर्षीचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार येथील रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि नाटककार अमेय धोपटकर यांना जाहीर झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे १५ जुलैला सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गेली ४७ वर्षे ही संस्था संगीत रंगभूमीसाठी प्रयत्नशील आहे. संगीत नाटकांना पुन्हा उज्ज्वल काळ प्राप्त झाला पाहिजे, या उद्देशाने मंडळ विविध उपक्रम राबवतात. त्यामध्ये संगीत नाटके, नाट्यसंगीत मैफली, नाट्यसंगीत स्पर्धा, परिसंवाद, पुरस्कार वितरण आदींचा समावेश असतो तसेच दरवर्षी बालगंधर्वांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो व त्यामध्ये विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
रत्नागिरीतील लेखक अमेय धोपटकर यांचे नाट्यक्षेत्रात योगदान आहे. संगीत कुरूमणी, संगीतमल्लिका अशी संगीतनाटकांचे लिखाण अमेय यांनी केले. तसेच त्यांनी शासनाच्या राज्यस्तरीय संगीत नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी होऊन उंची गाठली आहे. ते स्वतः कवी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते तसेच तंत्रज्ञ अशा क्षेत्रात पारंगत आहेत. यावर्षी संगीतमल्लिका या नाटकाला नाट्यस्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला होता.
बालगंधर्व-संगीत रसिक मंडळाने या त्यांच्या उभरत्या कार्याचा व नाट्यलेखनाचा विचार करून त्यांना अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रोख रुपये १५ हजार स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखळकर यांनी या पत्रकाद्वारे कळवले आहे. धोपटकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ रंगकर्मीकडून त्यांना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत. खासकरून संगीतमल्लिका या नाटकाच्या टीमने त्यांचे कौतुक केले.