तुकाराम हरचकर यांना शोकसभेत आदराजंली

तुकाराम हरचकर यांना शोकसभेत आदराजंली

तुकाराम हरचकर यांना आदराजंली
पावस, ता. ३१ः पूर्णगड गावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आणि खारवी समाज विकास समिती रत्नागिरीचे संस्थापक संचालक तुकाराम देवराम हरचकर यांना रत्नागिरीतील उद्यमनगर येथील खारवी समाजभवनात आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या शोकसभेला तुकाराम धातकर, दामोदर लोकरे, यशवंत लाकडे, चिंतामणी खडपे आदी उपस्थित होते. रत्नागिरी तालुका खारवी समाज विकास समिती आणि पूर्णगड खारवी समाज परिवर्तन मंच यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. तुकाराम हरचकर यांनी खारवी समाज विकास समितीसाठी खूप मोठं योगदान दिले आहे. त्यांचा सहभाग हा सर्वांनाच प्रेरणादायी होता, असे उद्गगार लोकरे यांनी काढले. खारवी समाजाचे हे अनमोल रत्न आपण सर्वजण हिरावून बसलो आहोत. त्यांची सार्वजनिक काम करण्याची पद्धत, चिकाटी, जिद्द, खेळाडू वृत्ती हे सगळे प्रत्यक्ष पाहताना ऊर भरून येत होता; पण आज अखंड समाजात ही भरून येणारी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे. त्या़ंच्या कुटुंबावर पडलेल्या या संकटात आम्ही सहभागी आहोतच; पण यापुढेही त्याच्या कुटुंबाला साथ नक्कीच देऊ, असे उद्गगार धातकर यांनी काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com