कणकवली शहराला 
पाणीटंचाईची झळ

कणकवली शहराला पाणीटंचाईची झळ

कणकवली शहराला
पाणीटंचाईची झळ
कणकवली,ता. ३१ ः शहरातील नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पाणी टंचाईची झळ बसणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील पाणीसाठा संपल्याने टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे एक जून पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे म्हटले आहे की, ‘‘शिवडाव धरणातून पाणी उपलब्ध झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. नागरिकांना व नळ कनेक्शन धारकांना या पाणीटंचाईसाठी अडचण निर्माण होणार आहे; पण नगरपंचायतीला सहकार्य करावे,’’ असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com