क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

पान ३

मिरजोळेत अपघातात दोघे जखमी
रत्नागिरी ः रत्नागिरी ते करबुडे रस्त्यावर मिरजोळे पाटीलवाडी येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केला. यात दुचाकीस्वारासह दोघे जखमी झाले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाहीदअल्ली अब्दुलरहीम धामस्कर (वय ४९, मजगाव मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित जाहीदअल्ली हे दुचाकी (एमएच ०८ वाय ४७६७) ही रत्नागिरी ते करबुडे फाटा असा जात असताना मिरजोळे पाटीलवाडी येथील उताराच्या वळणावर दुचाकी निष्काळजीपणे चालविली. अपघातात स्वतःसह साक्षीदार सौ. रोजीना (मजगाव, मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) यांना दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यास अटक
रत्नागिरी ः शहरातील उद्यमनगर येथे हेरॉइन या अमली पदार्थाच्या विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सुमित संजय जाधव (वय ३३, मेहमून हाऊस, पडवेकर कॉलनी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) पावणेनऊच्या सुमारास पडवेकर कॉलनी उद्यमनगर या भाड्याच्या घरात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पोलिसांच्या मोहीम पथकाने केलेल्या कारवाईत पडवेकर कॉलनी येथील भाड्याच्या घरात संशयित हेरॉईन हा अमली पदार्थ विक्रीकरिता बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंगळवारी (ता. ३०) संशयितास अटक केली आहे.

हातखंबा मार्गावर एसटी घसरली
रत्नागिरी ः हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर एसटीची बस बाजूपट्टीवर उतरल्याने अपघात झाला. या अपघातात एसटीचे चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. एसटी चालक सूर्यकांत रामदास राजेशिर्के (वय ५२, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) व वाहक दीपाली नारायण भायजे (वय ३०, रा. वेळवंड, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३१) दुपारच्या सुमारास हातखंबा-पानवल रस्त्यावर घडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

६१०५
कळंबस्ते मोहल्ला येथे डंपर घुसला घरात
चिपळूण ः शहरालगत असलेल्या कळंबस्ते मोहल्ला येथे मुंबई-गोवा महामार्गावरून मकिंग वाहून नेणारा डंपर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना साईडपट्टीवर उतरला. या वेळी भराव खचल्याने डंपर घरात घुसला. सुदैवाने, या अपघातात कोणी जखमी झाले नाही. या घटनेत मुकादम यांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या कामामुळे सातत्याने अपघात होत आहेत. शनिवारी रात्री वाहनाला बाजू देताना अचानक मकिंग वाहून नेणारा डंपर गटाराला भगदाड पडल्याने अडकला व रस्त्याच्या कडेला असलेल्या मुकादम यांच्या घरात आडवा झाला. त्यांच्या घराला मोठे भगदाड पडले. या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही; परंतु महामार्गालगत बांधलेली गटारे निकृष्ट दर्जाची असल्याने सातत्याने या भागात अपघात होत असून, ठेकेदार कंपनी दखल घेत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घरात या वेळी माणसं होती; परंतु ते दुसऱ्या बाजूला असल्याने अनर्थ टळला.

अलोरेत बंद घर फोडून चोरी
चिपळूण ः बंद घर फोडून त्यातील ५ हजार ४०० रुपयांची अॅल्युमिनिमची भांडी चोरीस गेल्याची घटना सहारा मंजील अलोरे मोहल्ला येथे रविवारी घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरमालक राहाते घर बंद करुन कामानिमित्त मुंबई येथे गेले असता १८ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता ते २८ मे २०२३ या कालावधीत संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयडा उचकटून घरात प्रवेश केला. तसेच ५ हजार ४०० रुपये किमतीची अॅल्युमिनियमची भांडी चोरुन नेली. हा प्रकार घरमालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अलोरे- शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.