कोकण कला संस्थेमार्फत
मुंबईत तंबाखू विरोधी दिन

कोकण कला संस्थेमार्फत मुंबईत तंबाखू विरोधी दिन

06195
मुंबई दादर ः येथे तांबखू विरोधी दिनानिमित्त आयोजित पदयात्रेत सहभागी झालेले कोकण कला संस्थेचे कार्यकर्ते.

कोकण कला संस्थेमार्फत
मुंबईत तंबाखू विरोधी दिन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ ः कोकण कला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सर्जनशील व्याख्या, शक्तिशाली व्हिज्युअल आणि विचार करायला लावणारे संदेश याद्वारे तंबाखूच्या वापराशी संबंधित गंभीर धोके नागरिकांमध्ये मांडत जागतिक तंबाखू विरोधी दिन मुंबई दादर येथे साजरा केला.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्थानक परिसरात तंबाखू विरोधी घोषणा देत तंबाखूजन्य वस्तूंच्या बदली सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेऊन दिल्यास अनेक गरजू महिलांना आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होईल, अशा उपदेशात्मक घोषणा दिल्या. या दरम्यान तंबाखू सेवनामुळे होणारे नुकसान आणि त्याची सवय सोडण्याबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये तरुणाईचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे, श्वेता चोरगे, साक्षी पोटे आणि सूरज कदम यांनी केले. अभियान यशस्वी करण्यासाठी ऋतुजा कांबळे, मेघना राठोड, निकिता पोटे, निकिता डांगे, सिंड्रेला जोसेफ, रिशिका सोळंकी, नेत्रा कदम, नयना जाधव, सालिना बुटेलो, श्वेता सावंत, कोमल कांबळे, विजया वाळके, सायली अंबुरे, प्राजक्ता कदम, दिव्या नगरकर, सुमन घरड, मयूर कांबळे, लतेश शिगवण आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com