
‘वंदे भारत’ला सावंतवाडीत थांबा न मिळणे हे अपयश?
06206
बबन साळगावकर
‘वंदे भारत’ला सावंतवाडीत
थांबा न मिळणे हे अपयश?
साळगावकरांचा केसरकरांवर निशाणा
सावंतवाडी, ता. ३१ ः वंदे भारत रेल्वेला सावंतवाडी रोड स्टेशनला थांबाही मिळू शकला नाही, हे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे अपयश समजायचे काय? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे.
श्री. साळगावकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सावंतवाडी हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे ऐतिहासिक शहर असून पर्यटनाच्या दृष्टीने देखील शहराला महत्व आहे. येथे मोठ्या संख्येने लोक राहतात; परंतु, रेल्वे खात्याने सावंतवाडी रेल्वे रोड स्टेशनवर अर्थातच सावंतवाडी तालुक्यावरती अन्याय केला आहे. सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर जर थांबे द्यायचे नसतील तर असलेले थांबे रद्द करा. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यासह गोवा राज्यातील पेडणे व परिसरातील गाव नजिकचे आहेत. असे असताना ‘वंदे भारत’ रेल्वेला थांबा मिळत नाही म्हणजे हे मंत्री केसरकरांचे अपयशच म्हणावे लागेल.’’