
भाजपचा लोकसभा मतदरासंघात कृतज्ञता मास
भाजपचा लोकसभा मतदारसंघात कृतज्ञता मास
प्रमोद जठार ; केंद्राच्या योजना घरोघरी पोचविणार
रत्नागिरी, ता. ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ९ वर्षे पुर्ण झाली. या नऊ वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या विविध विकास कामांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी जून हा कृतज्ञता मास म्हणून पाळला जाणार आहे. रत्नागिरी-सिंधुदु्र्ग जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात ५०० कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. हे कार्यकर्ते प्रत्येक वर्गाताली जनतेच्या घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या कामाचा प्रचार करून दोन वेळा निवडून दिल्याबद्धल कृतज्ञता व्यक्त करतील, अशी माहिती मोदी अॅट नाईनचे लोकसभा सहसंयोजक प्रमोद जठार यांनी दिली.
भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, सचिन वहाळकर, उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांनी या नऊ वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेऊन ती जनतेपर्यंत पोहचविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १ ते ३० जुन हा एक मास मोदींना निवडून दिलेल्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले जाणार आहेत. केंद्री मंत्री नाराणय राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या कृतज्ञता मासाचे प्रमुख आहेत. यासंदर्भात आज जिल्हा कार्यकारणीची बैठक घेऊन प्रत्येकावर जबाबदार देण्यात आली आहे.
नऊ वर्षाच्या कार्यकालाचे नऊ विभाग पाडण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, कोरोना काळातील काम, मंदिरांमधून सांस्कृतिचे पुनर्जीवन , क्युआर कोड, युपीआय क्रमांक, पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत मिशन, एक देश एक कर, लोककल्याणकारी योजना, आयुर्वेद व योगा दिन, असे विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा विशाल सभा, विधानसभा विशाल सभा, मेळावे घेण्यात येणार आहेत. योजनांचे लाभार्थी, शेतकरी, व्यापारी, सर्व वर्गातील लोकांना भेटुन केंद्र शासनाच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे.
चौकट-
विनायक राऊत भाजपमुळेच निवडून आले
युती म्हणून खासदार विनायक राऊत हे भाजपमुळे निवडून आले आहेत. आता आमचा उमेदवार चुकला. तरी आम्ही मतदारांचे आभार मानणानार आहे. केंद्राच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली. यामध्ये खासदार विनायक राऊत यांचे काय योगदना आहे हेत त्यांनी दाखवावे आणि १ हजार रुपये मिळावे, अशी टीका भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी केली.