भाजप जिल्हा कार्यकारिणीत लवकरच फेरबदल

भाजप जिल्हा कार्यकारिणीत लवकरच फेरबदल

पान १ साठी


भाजप जिल्हा कार्यकारिणीत
लवकरच होणार फेरबदल
बाळ मानेंची कार्यक्रमात हजेरी; दुरावलेला गट एकत्र
रत्नागिरी, ता. ३१ : भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू असून, सचिन वहाळकर आणि राजेश सावंत यांची नावे जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यात दुरावलेला भाजपचा जुना गट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्र येण्याचे चित्र बाळ माने यांच्या आजच्या बैठकीतील उपस्थितीमुळे दिसले. भाजप जून महिना हा कृतज्ञता मास पाळणार आहे. तीन वर्षांतील हा मोठा कार्यक्रम यशस्वी करण्याची संधी विद्यमान जिल्हाध्यक्षांना अॅड. दीपक पटवर्धन यांना त्यांचा कार्यकाल संपता संपता मिळणार आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असली, तरी जिल्ह्यात सत्तेचा फार मोठा फायदा पक्षाला झालेला नाही. ग्रामपंचायत, पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चमकदार कामिगिरी दिसत नाही. शहरापासून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करण्यातही भाजपला अपेक्षित यश नाही. त्यात माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, दादा दळी यांच्यासारखे ग्रामीण भागात संपर्क असलेले नेते बाजूला झाल्यामुळे भाजपमध्ये दोन गट पडल्याचे चित्र तयार झाले. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दौरा असो वा पक्षाच्या बैठका, बाळ मानेंचा गट अनुपस्थित होता. बाळ माने यांच्यावर बोलणे देखील काही नेत्यांनी टाळले होते. त्यामुळे बाळा माने यांचा एकला चलो रे कार्यक्रम सुरू होता. त्यांनी रत्नागिरी मतदारसंघात वैयक्तिक भेटी-गाठी सुरू ठेवल्या होत्या; परंतु पटवर्धनांच्या कार्यकालात कार्यक्रमात ते फारसे सहभागी होताना दिसत नव्हते.
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभा मतदरासंघात जून महिना हा कृतज्ञता मास म्हणून पाळला जाणार आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेला बाळ माने उपस्थित होते. त्याच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, बाळ माने यांच्याबाबत बोलण्यास भाजप नेते प्रमोद जठार यांनी टाळले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन आणि बाळ माने एकमेकांशी कुजबुजताना दिसत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील या दोन गटांमध्ये समझोता झाल्याचे दिसते. कारण बाळ माने, सतीश शेवडे यांच्यावर कृतज्ञता मासाची वैयक्तिक जबाबदारी दिली आहे. त्यात जिल्हा कार्यकारिणी बदलाच्या पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अनेकांचे लॉबिंग सुरू होते. काही मोठ्यांची नावे या स्पर्धेत होती. मात्र, ती मागे पडली असून सचिन वहाळकर, राजेश सावंत या दोघांची नावे जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.


पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ
भाजप पक्षाचा कृतज्ञता मास कार्यक्रम असल्याने जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदांना एक महिना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com