डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सावंतवाडीत निवृत्तीपर सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा
सावंतवाडीत निवृत्तीपर सत्कार
डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सावंतवाडीत निवृत्तीपर सत्कार

डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सावंतवाडीत निवृत्तीपर सत्कार

sakal_logo
By

06233
सावंतवाडी ः येथे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रमात बोलताना राजू मसुरकर. व्यासपिठावर डॉ. दुर्भाटकर व अन्य.

डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा
सावंतवाडीत निवृत्तीपर सत्कार
सावंतवाडी, ता. ३१ ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे आज नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. यानिमित्त येथे त्यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. सावंतवाडीत गेली २३ वर्षे जी काही सेवा करू शकलो, ते केवळ ईश्वराच्या आशीर्वादानेच शक्य झाले, असे भावोद्गार यावेळी डॉ. दुर्भाटकर यांनी या कार्यक्रमात काढले.
उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दुर्भाटकर हे आज नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोगतज्ज्ञ अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी मागील वर्षभर सांभाळली होती. २३ वर्षांच्या रूग्णसेवेत त्यांनी निःस्वार्थी सेवा केली. आजवर हजारो गर्भवती महिलांच्या प्रसुती त्यांच्या कार्यकाळात झाल्या. नव्या जीवाला जन्म देण्यासह मातेला पुनर्जन्म त्यांच्या माध्यमातून झाल्याने रूग्णालयातील ‘देव माणूस’, अशी ओळख त्यांनी जिल्ह्यात निर्माण केली.‌ त्यांच्या सेवानिवृत्त समारंभात उपस्थितांकडून त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीचा आढावा देत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुळ गोवा येथील असलेले डॉ. दुर्भाटकर यांच कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. याप्रसंगी डॉ. जयेंद्र परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. सौ. देशपांडे, डॉ. उत्तम पाटील, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. नागरगोजे आदींनी मनोगत व्यक्त केले.