मुसळे, केळुसकर यांना होळकर पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळे, केळुसकर यांना होळकर पुरस्कार प्रदान
मुसळे, केळुसकर यांना होळकर पुरस्कार प्रदान

मुसळे, केळुसकर यांना होळकर पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

swt11.jpg
06281
आंबेरीः येथे प्रिया मुसळे, श्रद्धा केळुसकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुसळे, केळुसकर यांना
होळकर पुरस्कार प्रदान
चौके : आंबेरी ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आंबेरी गावातील प्रिया मुसळे आणि श्रद्धा केळुसकर या दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सरपंच डिचोलकर यांच्या हस्ते शाल आणि प्रशस्तीपत्र देऊन मुसळे आणि केळुसकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसरपंच रवींद्र परब, ग्रामसेवक स्वाती कदम उपस्थित होते. ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला आहे. या पुरस्कारामुळे कर्तृत्ववान महिलांचा योग्य सन्मान झाला आहे, असे सरपंच डिचोलकर यांनी सांगितले.
..............
बीएसएनएलची सेवा विस्कळीत
चौकेः माणगाव खोऱ्यात महिण्यातून एक दोन दिवस बीएसएनएल रेंज मिळत नाही. काही वेळा महिण्यातून दोन तीन वेळा असा प्रकार होतो. बुधवार व गुरुवारी बीएसएनएल ची रेंज अशीच गायब झाली. वारंवार होणाऱ्या असुविधेमुळे बीएसएनएल धारक इतर कंपनीचे सीम कार्ड घेण्याच्या मनस्थितीत आहेत. बीएसएनएल कंपनीला तीच अपेक्षा आहे का? असा संतप्त सवाल बीएसएनएल ग्राहक विचारतात.
..................