बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा
बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

sakal_logo
By

swt12.jpg
06282
ओरोसः बांधकाम कामगार संयुक्त संघटना कृती समिती माध्यमातून आयुक्त आयरे यांना निवेदन देताना बाबल पावसकर, प्रसाद गावडे आदी.

बांधकाम कामगारांचे
प्रलंबित प्रश्न मार्गी लावा
संघ़टनेची मागणीः आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः बांधकाम कामगारांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी कामगार आयुक्त संदेश आयरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. बांधकाम कामगार संयुक्त संघटना कृती समितीच्या माध्यमातून आयुक्त आयरे यांची आज भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्गातील बांधकाम कामगार संघटना एकवटल्या. कामगार आयुक्तांबरोबर बांधकाम कामगारांच्या विविध योजना, रेंगाळलेली नोंदणी नूतनीकरण व इतर सर्व योजनासंबंधी मिळणारे लाभ या विषयावर चर्चा झाली.
कामगार आयुक्त आयरे यांनी लवकरच कामगारांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी संघटना अध्यक्ष बाबल नांदोसकर, सचिव साळकर, स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव सतीश कदम, स्वयंप्रत संघटनेचे अध्यक्ष झारापकर, सचिव बोवलेकर, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश दळवी, कोकण श्रमिक संघटना अध्यक्ष संतोष तेली, सचिव नारंगीकर तसेच दीपक गावडे, चंद्रकांत काळे, प्रदीप तांबे, अनिल कदम, विनायक मेस्त्री, शशिकांत कदम, गौतमी कदम, निकिता गावकर जगदीश गावडे, राजन पडवळ, राजाराम नाचणकर, रवींद्र चव्हाण, शैलेश परब उपस्थित होते.