गाळ काढण्यास अखेर मुहूर्त

गाळ काढण्यास अखेर मुहूर्त

swt110.jpg
06305
सावंतवाडीः मोती तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

गाळ काढण्यास अखेर मुहूर्त
मोती तलावः भूमिपूजनानंतर सहाव्या दिवशी सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः तलावातील गाळ कधी काढणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत असतानाच भूमिपूजनानंतर आज अखेर तब्बल सहा दिवसांनी मोती तलावातील गाळ काढण्याच्या कामाला मुहूर्त सापडला. आज सकाळपासून प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
मोती तलावातील उपसा करण्याच्या कामाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २५ मे रोजी केला होता. हे काम जलसंपदा विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात गेले सहा दिवस तलावामध्ये डंपर व पोकलेन मशीन उतरण्यासाठी आवश्यक असलेला रॅम्प तयार करण्यातच गेला. मुळात पावसाळा तोंडावर असताना तलावातील गाळ उपसा जलद गतीने व्हावा, अशी नागरिकांची मागणी असताना सुशेगात पद्धतीने सुरू असलेली ही मोहीम तलावातील गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचेही बोलले जात आहे. आज सहाव्या दिवशी रॅम्पच्या कामानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, आबा केसरकर, बांधकाम अधिकारी गजानन कुडपकर आदी उपस्थित होते.
मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असून अजूनही तलाव हवा तसा कोरडा झाला नाही. एक दिड फुटाच्या खाली पाणी असल्याने दलदल निर्माण होत आहे. त्यामुळे गाळ उपशाला काहीशी अडचण निर्माण होत आहे. तलावाचा कठडा सोडून साधारणतः पंधरा फूट अंतरावरील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जेणेकरून कठड्याला कोणतीही इचा पोचू नये, हा यामागचा उद्देश आहे. गतवर्षी पोकलेन मशीनने कठड्यावरूनच गाळ काढताना उपजिल्हा रुग्णासमोरील कठडा पावसाळ्यात कोसळला होता. तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करून तो पुन्हा नव्याने उभारण्यात आला. यामध्ये शासनाचे कोट्यावधी रुपये प्रशासनाच्या चुकीमुळे गेले. त्यामुळे झालेली चूक पुन्हा घडू नये, यासाठी आता गाळ काढताना खबरदारी घेतली जात आहे. काढलेला गाळ हा पालिकेच्या जिमखाना मैदाना परिसरात टाकला जात आहे.
--------------
चौकट
उपसा मोहीम युध्दपातळीवर
मोती तलावातील गाळ जास्तीत जास्त उपशा करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ उपसा मोहीम युध्दपातळीवर सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com