
पाटकर वर्दे महाविद्यालयात ''कुकिंग वर्कशॉप''ला प्रतिसाद
swt18.jpg
06310
पिंगुळीः पाटकर वर्दे कॉलेजमध्ये कुकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. (छायाचित्रः अजय सावंत)
पाटकर वर्दे महाविद्यालयात
‘कुकिंग वर्कशॉप’ला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढत्या पर्यटन व्यवसायाचा विचार करता येथील जास्तीत जास्त मुलांनी याचे प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी, असे प्रतिपादन शेफ भावेश म्हापणकर यांनी कुकिंग कार्यशाळेमध्ये केले. या कार्यशाळेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पाटकर वर्दे कॉलेजमध्ये हॉस्पिटॅलिटी अँड कॅटरिंगतर्फे दहावी बारावीमध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी हॉटेल हिल ट्रीट रिसॉर्ट येथे मोफत कुकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या वर्कशॉपमध्ये मुलांना पिझ्झा, बर्गर, पास्ता, कप केक आणि मॉकटेल्सचे प्रशिक्षण महाविद्यालयाचे तज्ज्ञ शेफ भावेश म्हापणकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
वर्कशॉपमध्ये सहभाग घेतलेल्या मुलांना पुढील करियरच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. सध्या हॉटेल व्यवसायात कोकणातील मुले मोठ्या संख्येने उतरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढत्या पर्यटन व्यवसायाचा विचार करता येथील जास्तीत जास्त मुलांनी याचे प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी, ह्या उद्दिष्टाने पाटकर वर्दे कॉलेजने बी.एस्सी (हॉस्पिटॅलिटी अँड कॅटरिंग) तसेच डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हे कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. येथील मुलांना पर्यटन तसेच हॉस्पिटॅलिटी व्यवसायासंदर्भात माहिती मिळावी व त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, ह्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला. महाविद्यालयातून बाहेर पडलेले गुणवंत विद्यार्थी मुंबई, पुणे तसेच गोवा येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, तर काही जण मोपा येथील विमानतळावर कार्यरत आहेत, अशी माहिती देण्यात आली.