राजापूर-अर्जुनाच्या पुलावर आरटीडीएएस यंत्रणा कार्यान्वित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-अर्जुनाच्या पुलावर आरटीडीएएस यंत्रणा कार्यान्वित
राजापूर-अर्जुनाच्या पुलावर आरटीडीएएस यंत्रणा कार्यान्वित

राजापूर-अर्जुनाच्या पुलावर आरटीडीएएस यंत्रणा कार्यान्वित

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat1p3.jpgKOP23M0629२, rat1p4.jpgKOP23M06293 - राजापूर ः ब्रिटीशकालीन पुलावर बसविण्यात आलेली ब्रीज रडार सेन्सॉर यंत्रणा.
---------------

अर्जुनाच्या पुलावर आरटीडीएएस यंत्रणा कार्यान्वित

प्रत्येक तासाला अपडेट ; आठ ठिकाणी रेन गज यंत्रणाही बसवली

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 1 : नदीची वाढणार्‍या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाईम डाटा अ‍ॅक्विजिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने अर्जुना नदीवरील पुलावर बसविण्यात आली आहे. त्याचवेळी तालुक्यातील आठ ठिकाणी पावसाच्या पाण्याची मोजदाद करणारी रेन गेज यंत्रणाही बसविण्यात आली आहे. एआरएस आणि एडब्लूएलआर या दोन्ही अत्याधुनिक यंत्रणा सॅटेलाईट, सेन्सर आणि जीपीएसच्या साह्याने मोबाईल अ‍ॅपला जोडण्यात आलेली असून त्याद्वारे राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला अतिवृष्टीमध्ये अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीसह पावसाच्या पाण्याची प्रत्येक तासाला अपडेट मिळणार आहे.
गेल्या काही वर्षामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी होवून विशेषतः कोकणामध्ये वारंवार पूरस्थिती निर्माण त्यामध्ये अतोनात नुकसान होत आहे. या संभाव्य पूरस्थितीची लोकांना आधीच माहिती मिळाल्यास त्यामध्ये होणारी वित्त आणि जीवितहानी टाळणे अधिक सोपे होईल. यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कृष्णा खोर्‍याच्या धर्तीवर जलसंपदा विभागाच्या नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील अर्जुना नदीवरील पूलावर रिअल टाईम डाटा अ‍ॅक्विजिशन सिस्टीम (आरटीडीएएस) या अत्याधुनिक बसविण्यात आलेल्या यंत्रणेचा समावेश असल्याची माहिती निवृत्त डेप्युटी इंजिनिअर जे. जी. पाटील यांनी दिली. एआरएस आणि एडब्लूएलआर या दोन यंत्रणांमुळे एका क्लिकवर पडलेला पाऊस आणि नद्यांच्या विद्यमान पाण्याची पातळी प्रशासकीय यंत्रणेला उपलब्ध होते. या माहितीद्वारे संभाव्य पूरस्थितीपासून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देणे वा संभाव्य पूरस्थितीपासून संभाव्य आपद्ग्रस्त लोकांचा बचाव करणे प्रशासकीय यंत्रणेला आता अधिक सोपे होत आहे.
-----------
चौकट ः
रेन गेज आणि ब्रीज रडार सेन्सॉर अशी करणार मदत

पाटबंधारे विभागाकडून पावसाची नोंद ठेवणारी रेन गेज ही अत्याधुनिक यंत्रणा तालुक्यातील करक, रायपाटण, सोलीवडे, शेंबवणे, येरडव, आडीवरे आदी ठिकाणी बसविण्यात आलेली आहे. रेन गेज (पर्जन्य केंद्र) उपकरणामध्ये पडलेल्या पावसाची नोंद ही सॅटेलाईट यंत्रणेव्दारे नाशिक आणि कळवा येथील जलविज्ञान प्रकल्पाच्या सर्व्हरवर जाणार आहे. यामध्ये नोंद तासाला जशी हवी आहे त्यानुसार त्याचे रिडींग सेटींग टाईम नुसार केलेले आहे. त्याचबरोबर ब्रीज रडार सेन्सॉर हे नदीतील पाणीपातळीचे फोटो क्षणाक्षणाला सॅटेलाईटव्दारे सर्व्हरला पाठवण्याचे काम करतो. यामध्येही वाढलेल्या पाणी पातळीसह नदीतील विसर्गाचीही माहिती मिळते.