शाळेच्या विकासात सरोज नाईकांचा सिंहाचा वाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेच्या विकासात सरोज नाईकांचा सिंहाचा वाटा
शाळेच्या विकासात सरोज नाईकांचा सिंहाचा वाटा

शाळेच्या विकासात सरोज नाईकांचा सिंहाचा वाटा

sakal_logo
By

swt115.jpg
06327
बांदाः येथील केंद्रशाळेत आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक यांना सन्मानपत्र देऊन गौरविताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर.

शाळेच्या विकासात सरोज नाईकांचा सिंहाचा वाटा
उपस्थितांकडून कौतुकः बांदा केंद्रशाळेत सेवानिवृत्तीपर सत्कार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः येथील केंद्रशाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासात ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्ञानदानाचे कार्य करून त्यांनी केवळ विद्यार्थीच घडविलेत नाहीत तर याही पलीकडे त्यांनी सर्वांना एकत्रित घेत शाळेचे उत्तम व्यवस्थापन राखले. शाळेबद्दल असलेली त्यांची तळमळ व झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीनेच आज केंद्रशाळा ही राज्यस्तरावरील एक उत्कृष्ट शाळा म्हणून नावारूपास आली आहे. त्यांनी निवृत्तीनंतरही आपले शैक्षणिक कार्य निरंतर सुरु ठेवावे, असे कौतुकोद्गार विविध मान्यवरांनी येथे काढले.
येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका नाईक या नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यात. यानिमित्त प्रशालेत सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर खेमराज हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक एस. व्ही. नाईक, केंद्रप्रमुख संदीप गवस, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला शिक्षकांनी सौ. नाईक यांचे औक्षण केले. यावेळी केंद्रशाळा, व्यवस्थापन समिती यांच्यावतीने अध्यक्ष मोरजकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक ''सकाळ''ने नाईक यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना प्रसिद्ध केलेल्या पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रशाळेतील शिक्षक रंगनाथ परब, उर्मिला मोर्ये, शीतल गवस, शुभेच्छा सावंत, अनुराधा धामापूरकर, स्वाती पाटील, शरद राऊळ, खेमराजचे शिक्षक पृथ्वीराज बांदेकर, हनुमंत मालवणकर, श्रीकांत आजगावकर, संदीप गवस, गोवा पोलीस सेवेत असलेले प्रकाश मळीक यांनी मनोगतात अनेक आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांमधून नैतिक मोरजकर, अमोघ वालावलकर यांनी मनोगत व्यक्त करत नाईक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नैतिकने नाईक यांच्या नावावरून बनविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन केले.
सत्काराला उत्तर देताना सौ. नाईक या भावुक झाल्या. आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण याठिकाणी शाळेच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ शकले. यापुढेही शाळेसाठी व शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आपण नेहमीच तत्पर राहू, असे सांगितले. यावेळी मुलगा निशिध नाईक कन्या निकिता शिंदे, जावई अक्षय शिंदे, पुतणे रोहन नाईक, रोहित नाईक, भाचे प्रकाश मळीक, राजाराम दळवी, सोनू दळवी, श्रीराम सावंत, वहिनी जयश्री दळवी, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, व्यवस्थापन समिती सदस्य संतोष बांदेकर, शिक्षिका रसिका मालवणकर, जागृती धुरी, नितिशा देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. सायंकाळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांनी सौ. नाईक यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

चौकट
दातृत्वशील नाईक कुटुंब
सौ. सरोज नाईक व कुटुंबीय यांनी आपल्यातील दातृत्व गुण दाखवत आतापर्यंत शाळेसाठी साउंड सिस्टीम, तसेच वर्गखोलीचे फर्शीकरण स्वखर्चातून करून दिले आहे. आतापर्यंत कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेत त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. सावित्रीबाई दत्तक पालक योजनेसाठी त्यांनी रक्कम देखील दिली आहे. त्यांच्यातील या दा्तृत्व गुणांचे उपस्थितांनी कौतुक केले.