
निवृत्त 40 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
swt११३.jpg
06325
सिंधुदुर्गनगरी : सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना सीईओ प्रजित नायर. सोबत संजय कापडणीस व पराडकर कुटुंबीय.
निवृत्त ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
सिंधुदुर्गनगरीत सोहळाः सीईओं नायरांच्या उपस्थितीत निरोप
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ः जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, वेंगुर्ले गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्यासह ४० अधिकारी, कर्मचारी काल (ता. ३१) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त झाले. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजन करीत त्यांना निरोप देण्यात आला. प्रशासक नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, महिला व बाल कल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांच्यासह अन्य विभागाचे खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पराडकर म्हणाले, ‘‘प्रशासकीय सेवेत सुरुवातीला गटविकास अधिकारी म्हणून कणकवली, देवगड व मालवण येथे काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर निवृत्तीच्या काळातील अनेक वर्षे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. प्रामाणिकपणे काम करताना आपला जिल्हा म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न केला. नावीन्यपूर्ण कामावर जास्त भर दिला. यावेळी लाभलेल्या सर्व सीईओंचे चांगले सहकार्य लाभले. कर्मचाऱ्यांचेही तेवढेच सहकार्य लाभले.’’
चौकट
राजेंद्र पराडकरांचे काम आदर्शवत
राजेंद्र पराडकर यांच्या सेवानिवृत्तीमुळे जिल्हा परिषदेतील एक अभ्यासू व प्रामाणिक अधिकारी कमी झाला आहे. त्यांचे प्रशासकीय काम आदर्शवत आणि अविस्मरणीय आहे, असे गौरवोद्गार यावेळी सीईओ प्रजित नायर यांनी काढले.