फोटोसंक्षिप्त-ओटवणे ग्रामपंचायतीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-ओटवणे ग्रामपंचायतीतर्फे 
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
फोटोसंक्षिप्त-ओटवणे ग्रामपंचायतीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

फोटोसंक्षिप्त-ओटवणे ग्रामपंचायतीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

sakal_logo
By

फोटोसंक्षिप्त
०६३३०

ओटवणे ग्रामपंचायतीतर्फे
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
ओटवणे ः येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाणवाडी येथील रसिका मेस्त्री आणि शेरवाळेवाडी येथील नेहा मयेकर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित केले. शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण ग्रामपंचायतस्तरावर करण्याचे अध्यादेश दिले. ओटवणे ग्रामपंचायतीकडून येथील ग्रामपंचायत कर्मचारी तथा कोरोनाच्या काळात ''शाळेबाहेरील शाळा'' या उपक्रमांतर्गत गावातली मुलांना एकत्र बसवून अध्ययनाचे काम करणाऱ्या रसिका मेस्त्री आणि मायबा प्रोड्यूसर कंपनीच्या गाव प्रतिनिधी व सातुळी बावळाटच्या एम.व्ही.पी. ऑनर नेहा मयेकर यांची निवड केली. सामाजिक योगदानाबद्दल कर्तबगार महिला म्हणून त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, रवींद्र म्हापसेकर, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता भगत, समीक्षा गावकर, मनाली गावकर आदींसह अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

०६३४५
वेत्ये ग्रामपंचायतीत
गुणवंत गौरव सोहळा
सावंतवाडी ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वेत्ये ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव केला. गावातील संतोषी गावकर व नूतन कोकुळकर या कर्तबगार महिलांचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान केला. सरपंच गुणाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य भगवान गावडे, राजेंद्र आंबेकर, महेश गावडे, तन्वी गावकर, नंदिनी निगुडकर, रमेश गावकर, ग्रामस्थ गुरुदास गावकर, संतोष गावडे, शरद जाधव, सत्यवान गावडे, सुशील कोकुळकर, मनोज पाटकर, हरिश्चंद्र गावकर, आनंद नाईक, सुरेश धारगळकर, एकनाथ गावडे, शंकर गावकर, संजय गावकर, रमेश जाधव, तसेच बचतगट महिला उपस्थित होत्या. यावेळी वेत्ये ग्रामसेवक राजेश परब यांच्या बदलीनिमित्त त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.