रत्नागिरी- मांडवीच्या हॉटेल सी फॅन्सला इंडस्ट्रियल भेट

रत्नागिरी- मांडवीच्या हॉटेल सी फॅन्सला इंडस्ट्रियल भेट

फोटो ओळी
-rat१p१३.jpg-KOP२३M०६३०० रत्नागिरी : मांडवी येथे हॉटेल सी फॅन्सला भेट देणारे कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थी. सोबत सुहास ठाकूदेसाई, महेश बेडेकर, अमेय मुळ्ये, ऋषिकेश मेहेंदळे आदी.
---------
कौशल्य विकास केंद्रातील मुलांची
हॉटेल सी फॅन्सला इंडस्ट्रियल भेट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात नव्यानेच सुरू झालेल्या कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल सी फॅन्सला इंडस्ट्रियल भेट दिली. कौशल्य विकास केंद्राचे अलिकडेच लोकार्पण झाले आहे. भेटीमध्ये कौशल्य विकास केंद्रातील फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस असोसिएट, हाऊस किपिंग सुपरवायझर या बॅच मधील ६० मुलांनी सहभाग घेतला.
या वेळी रिसेप्शन, फ्रंट ऑफिसचे कामकाज कसे चालते याबद्दल सिनियर मॅनेजर अभिषेक शिंदे, रिसेप्शन स्टाफ अनिकेत पवार, युवराज मालवीया आणि रेस्टॉरंट कॅप्टन ऐश्वर्या वाघाटे यांनी फ्रॅट अॅंड बॅक सर्व्हिसबद्दल सर्व महिती दिली.
समारोप प्रसंगी हॉटेलचे पार्टनर सुहास ठाकूरदेसाई यांनी रत्नागिरीतील मुलांना रत्नागिरीतच रोजगाराची संधी कशी आहे, याविषयी मार्गदर्शन केले. हॉटेल व्यवसायाविषयी सविस्तर माहिती दिली. काही विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कथन केले. तसेच कौशल्य विकास केंद्राचे प्रशासक महेश बेडेकर यांनी आजच्या हॉटेल सी फॅन्स भेटीमुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी सर्व विद्यार्थी सुहास ठाकूदेसाई, कौशल्य विकास केंद्राचे व्यवस्थापक/प्लेसमेंट मॅनेजर महेश बेडेकर, अमेय मुळ्ये, ऋषिकेश मेहेंदळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com