संगमेश्वरात थांबा द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वरात थांबा द्या
संगमेश्वरात थांबा द्या

संगमेश्वरात थांबा द्या

sakal_logo
By

जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधाला संगमेश्वरात थांबा द्या
मराठा फाउंडेशनचे निवेदन ; प्रवाशांचा त्रास कमी होईल
साडवली, ता. ३१ : गेली अनेक वर्षे आंदोलन करूनही संगमेश्वर रेल्वे स्थानकात जनशताब्दी, नेत्रावती आणि मत्स्यगंधा या जलद गाड्यांना थांबा मिळालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रेल्वे स्थानक हे प्रमुख गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे. नोकरीनिमित्त सुमारे ३ लाख चाकरमानी मुंबई- ठाणे पनवेल- विरार पर्यंत ये- जा करत असतात. या गाड्या फक्त चिपळूण रत्नागिरी येथेच थांबतात. त्यामुळे संगमेश्वर परिसरातील प्रवाशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
उन्हाळी, गणपती आणि होळी (शिमगा) हंगामात उच्चांकी प्रवासी संख्या असूनही दक्षिणेकडील राज्यांना प्राधान्य दिले जात आहे. सदर संगमेश्वर प्रवाशांवर सतत होणारा अन्याय दूर करण्यासाठी किंबहुना न्याय देण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मराठा फाउंडेशन तर्फे गणेश दत्ताराम खामकर (अध्यक्ष, मराठा फाउंडेशन) आणि पद्मश्री गजानन जगन्नाथ माने यांच्या उपस्थितीत कोकण रेल्वेचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. रेल्वेच्या अनेक समस्यांवर आणि कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या अन्यायावर सखोल चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सुमारे कोरोना काळापासून अद्याप रत्नागिरी - दादर ही रेल्वे पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच जात आहे. सदर गाडी पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करण्यात यावी जेणेकरून रत्नागिरी परिसरातील रेल्वे प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक त्रास कमी होईल याची विनंती मराठा फाउंडेशन तर्फे कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात आणणारे कोकण रेल्वेचे शिल्पकार सर्वश्री कै. बॅरिस्टर नाथ पै, माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते, श्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाचे फलक रत्नागिरी आणि चिपळूण रेल्वे परिसरात लावण्याची मागणी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडे न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा कायम राहील, अशी माहिती मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश खामकर यांनी दिली.