रत्नागिरी- विद्यार्थिंनींना गद्रे इन्फोटेकतर्फे प्रशिक्षण

रत्नागिरी- विद्यार्थिंनींना गद्रे इन्फोटेकतर्फे प्रशिक्षण

महर्षी कर्वे बीसीए कॉलेजच्या
विद्यार्थिंनींना गद्रे इन्फोटेकतर्फे प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. १ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन्स फॉर वुमेन (बीसीए) येथील ६ विद्यार्थिनींना गद्रे इन्फोटेकतर्फे एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये द्वितीय वर्ष बीसीएच्या लक्ष्मी खोचरे, अलवीन पारीख, मैथिली कीर, प्रगती बंडबे, आदिती साळवी व सानिका वायंगणकर यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणामुळे पुढील शैक्षणिक वर्षामध्ये या विद्यार्थिनींना कॅम्पस प्लेसमेंटसाठी नक्कीच फायदा होणार आहे.
बीसीए कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी मागील बारा वर्षापासून कॅम्पस प्लेसमेंटअंतर्गत विप्रो, इन्फोसिस, कॉग्नीझंट, टीसीएस, ॲटॉस, पटनी व डिलॉईट आदी बहुराष्ट्रीय कंपनींच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. ट्रेनिंग ॲड प्लेसमेंट विभागातर्फे विद्यार्थिनींना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी त्यासाठी लागणारी पात्रता, नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेली बौद्धिक, तांत्रिक कौशल्य, संभाषण कौशल्ये यावर नियमितपणे मार्गदर्शन केले जाते. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयातील ६ विद्यार्थिनींना गद्रे इन्फोटेकतर्फे १ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यात सहभागी विद्यार्थिनींची प्रशिक्षणासाठी निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात आली. विद्यार्थिनींना प्रोजेक्ट लाईफ सायकल, प्रेझेंन्टेशन, डॉक्युमेंन्‍टेशन, वर्क कल्चर, वेळेच व्यवस्थापन, संघ कार्य याबद्दल माहिती मिळाली. विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण गद्रे इन्फोटेकचे मंदार काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गोगटे यांनी दिले. या मिळालेल्या प्रशिक्षणामुळे पुढील शैक्षणिक वर्षामध्ये होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी विद्यार्थिनींना नक्कीच फायदा होणार आहे. याबद्दल महर्षी कर्वे संस्थेच्या पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकांनी गद्रे इन्फोटेकचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com