रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१p१९.jpg-KOP२३M०६३२१ पुणे : अखिल भारतीय सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळवणाऱ्या ताल कथ्थक नृत्यालयाच्या विद्यार्थिनी.
------------

ताल कथ्थक नृत्यालयाच्या
विद्यार्थिनींचे पुणे येथे यश
रत्नागिरी : पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक स्पर्धेत रत्नागिरीतील कथ्थक नृत्यगुरू सौख्यदा वैशंपायन यांच्या ताल कथ्थक नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. ताल कथ्थक नृत्यालयाच्या गटाने द्वितीय, तर एकल नृत्य स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळवले. पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ही स्पर्धा झाली. सांघिक व एकल स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. सामूहिक नृत्यात वैशंपायन यांच्या विद्यार्थिनींनी तीन ताल सादर केला. यामध्ये सावनी भोजे, अंतरा रायकर, मनस्वी नांदगावकर, स्पृहा झगडे, श्रेयसी सुर्वे यांच्या गटाला समूह नृत्याचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेत पूर्वा माईणकर, दक्षा आठल्ये, धनिष्ठा खेडेकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व सौ. नीला केळकर हिला एकल नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे घेण्यात आलेल्या या शास्त्रीय नृत्य स्पर्धेचे यंदाचे एकोणिसावे वर्ष होते.


आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे
पर्यावरणदिनी रोपवाटप कार्यक्रम
रत्नागिरी : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन ही रत्नागिरीतील अग्रगण्य आणि दहा वर्षांहून अधिक काळ सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. आसमंततर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिरडा, बेहडा, उंडी आणि सुरंगी यांची प्रत्येकी ३०० रोपे देण्यात येणार आहेत. या झाडांच्या रोपांचं अत्यल्प देणगी मूल्य घेऊन वितरण करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनी (ता. ५) सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या एमआयडीसी येथील जैवविविधता उद्यानात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जैवविविधता उद्यानालाही भेट देता येईल. दिल्या जाणाऱ्या रोपांचे योग्य पद्धतीने जतन करणे आवश्यक आहे. या वेळी जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आसमंतचे प्रमुख संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे. आसमंत फाउंडेशनतर्फे मुलांचा सर्वांगीण विकास, भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार, निसर्ग संवर्धन, पर्यावरण आणि जंगले या क्षेत्रांमध्ये काम केले जात आहे. आसमंतने २३ जानेवारी २०२३ रोजी महासागर साजरा केला आणि वर्षभर संशोधन कार्यक्रमाद्वारे महासागरांमध्ये काम करणे सुरू ठेवले आहे. एमआयडीसी पीएम- ७५ येथे ८ एकर जागेत जैवविविधता उद्यान वसले आहे.


फोटो ओळी
-rat१p२४.jpg-KOP२३M०६३५५ शिल्पा मराठे


भाजपा महिला प्रदेश सचिवपदी
शिल्पा मराठे यांची नियुक्ती
राजापूर : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या सौ. शिल्पाताई धनंजय मराठे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली. या निवडीने रत्नागिरीला प्रदेशात मोठी संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपाध्यक्षपदी सिंधुदुर्गातील प्रज्ञा ढवण आणि सचिवपदी प्रिया शर्मा (कल्याण) आणि शिल्पा मराठे (रत्नागिरी) यांच्या नावांची घोषणा केली. उर्वरित नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित करू असेही सांगितले आहे. दक्षिण रत्नागिरी भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस शिल्पाताई मराठे या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती झोपडपट्टी व सर्व मतदारांना देण्याकरिता त्यांनी प्रभागांमध्ये काम केले आहे. आशा सेविकांवर राज्यातील मागील मविआ सरकारने अन्याय केला होता. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा सौ. मराठे यांनी तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता. हळदीकुंकू समारंभातून प्रभागातील सर्व महिला कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने त्यांनी शिक्षिकांचा सन्मानही केला. त्यांच्या या सक्रिय सहभागी नोंद घेत आता सचिव पदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी व राजापूरमधील भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना येस बँकेत नोकराची संधी
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल व ठाणे येथील करिअर क्राफ्ट ही एम्प्लॉयमेंट अॅडव्हायजर एल.एल.पी. यांचे संयुक्त विद्यमाने ८ जून रोजी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. येस बँकेतील सेल्स ऑफिसर या पदांकरिता रत्नागिरी शाखेत भरावयाच्या जागांकरिता मुलाखती होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी येस बँक, पर्णिका एम्पायर, शिवाजी नगर येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे. सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणावीत. या मुलाखतीसाठी २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये पदवी घेऊन बाहेर पडलेले तसेच २०२२-२३ या वर्षामध्ये पदवी परीक्षा दिलेले कोणत्याही शाखेतील विद्यार्थी पत्र असतील. अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.