दाभोळ-कोंढेतील बिबट्याला जीवदान

दाभोळ-कोंढेतील बिबट्याला जीवदान

फोटो ओळी
-rat१p२८.jpg-KOP२३M०६३७७ कोंढे (ता. राजापूर) : शांताराम पीरजानकर यांच्या विहिरीत पडलेला बिबट्या.
-------------

कोंढेतील बिबट्याला जीवदान

विहिरीत पडला ; नैसर्गिक अधिवासात सोडले

दाभोळ, ता. १ : दापोली तालुक्यातील कोंढे येथील शांताराम अर्जुन पीरजानकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
कोंढे गोरीवले वाडीतील पीरजानकार यांच्या विहिरात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता. ही बाब पिरजादे यांना आज सकाळी लक्षात आल्यावर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याची सुटका करण्यासाठी सर्व साहित्य घेवून या विहिरीजवळ आले. ही विहीर सुमारे ४० फुट खोल होती. या विहिरीत पिंजरा सोडण्यात आल्यावर सुमारे १.३० वाजता हा बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर त्याला दापोली येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात आणून त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली. हा बिबट्या नर जातीचा असून दीड ते २ वर्षे वयाचा असून वरिष्ठांच्या परवानगीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचाव मोहिमेत परिक्षेत्र वनधिकारी पी. जी. पाटील, वनपाल सावंत (दापोली), अ. रा. दळवी (मंडणगड), सु. आ. उपरे (खेड), वनरक्षक जळणे, भिलारे, जगताप, गुरव, झाडे, ढाकणे, बम्बर्गेकर यांच्यासह सर्पमित्र सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com