विलास माळी याना सेवानिवृत्तनिमित्त निरोप

विलास माळी याना सेवानिवृत्तनिमित्त निरोप

पान ५ साठी)

०६३८२
विलास माळी यांना सेवानिवृत्तनिमित्त निरोप
दाभोळ : दापोली तहसील कार्यालयातील विलास गोपाळ माळी हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांना निरोप देऊन शुभेच्छा दिल्या. विलास माळी यांनी सन १९८३ मध्ये महसूल खात्यामध्ये शिपाई पदावर सेवेस सुरवात केली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, खेड, मंडणगड, दापोली मध्ये अविरत अशी ४० वर्षे १७ दिवस निष्कलंक सेवा बजावून ते निवृत्त झाले. त्यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, निवासी नायब तहसीलदार शरद आडमुठे, महसूल नायब तहसीलदार रणजित शिराळकर, दापोली तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार व सर्व महसुली कर्मचाऱ्यांनी माळी काकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा सपत्नीक सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com