शासन आपल्या दारीच्या यशाची दखल राज्यभरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासन आपल्या दारीच्या यशाची दखल राज्यभरात
शासन आपल्या दारीच्या यशाची दखल राज्यभरात

शासन आपल्या दारीच्या यशाची दखल राज्यभरात

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१p३०.jpg-KOP२३M०६३८३ रत्नागिरी ः जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत जिल्हा परिषद मुख्यकार्याकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.


शासन आपल्या दारीच्या यशाची दखल राज्यभरात
उदय सामंत ; रत्नागिरीतील पथक मार्गदर्शनासाठी कोल्हापूरला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : शासन आपल्या दारी ही योजना जिल्ह्यात कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या या यशस्वी कार्यक्रमाची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे. सिंधुदूर्ग व कोल्हापूर येथे अशाच प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रत्नागिरीतील पथक मार्गदर्शनासाठी गेले आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० फुटी उंच ध्वजस्तंभाप्रमाणेच जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात ७५ फुट उंचीचा ध्वजस्तंभ उभारुन झेंडा फडकवण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यासाठी सुमारे २५ ते ३० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. स्तंभ उभारणार्‍या कंपनीकडेच पुढील पाच वर्षात देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही दिली जाणार आहे. याबाबत स्थानिक आमदारांशीही चर्चा करण्यात आल्याचे आहे. रत्नागिरीत झेंड्याची उंची वाढवली जाणार आहे. त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती, व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील पाच हजार विद्यार्थ्यांमार्फत कार्यक्रमही केला जाणार आहे.
उमेद अतंर्गत कार्यरत असणाऱ्या बचत गटांच्या अडचणी समजून घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी उमेदमध्ये काम करणार्‍या सीआरपींना मानधन वाढवण्याबाबतच्या मागणीवरही चर्चा करण्यात आली.
शिरगाव येथे बचत गटांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणात पोलिस यंत्रणा योग्य तो तपास करुन कारवाई करेल. यामध्ये कायद्याच्या बाहेर जाऊन कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.


चौकट
बारसू माती परीक्षण अहवाल महिनाभरात
बारसू येथे प्रस्तावित ग्रीन रिफायनरीसाठी माती परीक्षण मागील काही दिवस करण्यात येत होते. यासाठी सुमारे ७२ बोअर पाडण्यात आल्या. याचा अहवाल महिनाभरातच येईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यानंतर रिफायनरीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.