चिपळूण-जाहिरात बातमी

चिपळूण-जाहिरात बातमी

फोटो ओळी
- ratchl१२.jpg- KOP२३M०६३८४ चिपळूण ः सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ

समर्थ नागरी पतसंस्थेचा १४ टक्के लाभांश जाहीर
वार्षिक सभेत घोषणा ; गुणवंत पाल्यांचा सत्कार
चिपळूण, ता. १ ः श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थेची वार्षिक सर्वसाधारण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. यानिमित्ताने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
सभासदांचे स्वागत झाल्यानंतर सभेच्या विषय पत्रिकेनुसार सभेच्या कामकाजाला सुरवात झाली. सभासदांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीचे कौतूक केले. संस्थेचे सभासद श्री. टेरवकर म्हणाले, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्वरित घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. तसेच भागभांडवलपोटी गुंतवणूक करणाऱ्या सभासदांच्या आर्थिक हिताचा विचार केला आहे. याबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ यांचे विशेष अभिनंदन. संस्थेने सादर केलेल्या वार्षिक अहवालावर सभासदांनी आपले मत व्यक्त करून सक्रीय सहभाग नोंदवला. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. श्री. आरेकर यांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीची माहिती दिली. तसेच संस्थेने केलेल्या सर्व निकष पूर्ततेची माहिती दिली. संस्थेच्या प्रगतीमध्ये सहकारी संचालक संस्थेचा कर्मचारी, सर्व सभासद, ठेवीदार व हिंतचितकांचे योगदान असल्याने त्यांनी सांगितले. संस्थेचे कामकाज पारदर्शक असून सभासदांनी केलेल्या चांगल्या सूचना नेहमीच स्वागतार्ह असतील. सभासदांचा नेहमीच सक्रीय सहभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेने सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर केला असून सभासदांनी शेअर्समध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, सचिव संदीप रहाटे, संचालक अरूण पाटील, दिलीप मयेकर, पराग आरेकर, उदय वेल्हाळ, संचालिका प्रज्ञा नरवणकर, स्मिता आरेकर, पल्लवी भाटकर यांच्यासह कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com