सिंधुदुर्गनगरीत ''बांधकाम''तर्फे दक्षता-गुणनियंत्रण प्रयोगशाळा

सिंधुदुर्गनगरीत ''बांधकाम''तर्फे दक्षता-गुणनियंत्रण प्रयोगशाळा

सिंधुदुर्गनगरीत ''बांधकाम''तर्फे
दक्षता-गुणनियंत्रण प्रयोगशाळा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ः येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळा सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने आजपासून सुरू झाली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते केले होते; मात्र अधिकारी व काही तांत्रिक बाबींमुळे या प्रयोगशाळेचे कामकाज सुरू होऊ शकले नव्हते. सिंधुदुर्गमधील ठेकेदारांना कामाच्या टेस्टींगबाबत रत्नागिरीला जावे लागत असल्याने ही प्रयोगशाळा सुरू होणे गरजेचे होते. त्यानुसार प्रयोगशाळेचे प्रत्यक्षात काम सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू होता. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याने या प्रयोगशाळेचे काम सुरू झाले. येथे उपअभियंता सय्यद व चौधरी हे कामकाज पाहणार आहेत. जिल्ह्यातील ठेकेदारांना आता टेस्टींगसाठी रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नसल्याने याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com