
कुडाळात 6 जूनला रोजगार मेळावा
कुडाळात ६ जूनला रोजगार मेळावा
ग. प्र. बिटोडेः ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ः खासगी क्षेत्रातील कारखाने, उद्योजक, व्यापार, दुकाने, शॉप्स व इतर व्यवसाय यांना सद्यस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कुडाळ येथे ६ जूनला सकाळी १० वाजता आयोजित केला आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी दिली.
उद्योजकांना आवश्यक असलेल्या रिक्तपदांची माहिती त्यांच्या लॉगीनने ऑनलाईन पोस्ट करण्याची सुविधा कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर उपलब्ध आहे. ज्या उद्योग आस्थापनांनी या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही. परंतु, त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, अशा उद्योजकांनी प्रथम वरील पोर्टलव्दारे आपली नोंदणी करून रिक्तपदे पोस्ट करावीत.
नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची उद्योजक ६ जूनला मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखती घेवून नियोत्यांच्या अटी-शर्ती नुसार उमेदवारांची अंतिम निवड केले जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक उमेदवारांनी ‘शासन आपल्या दारी’ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
--------------
चौकट
मेळाव्यामध्ये अधिसुचित रिक्तपदे
पदे*जागा*शैक्षणिक अर्हता
कारपेंटर*२५*आयटीआय (वयोमर्यादा १८ ते ३५, अनुभव किमान १ वर्ष.)
असिंस्टंट कारपेंटर*२५*१० वी पास (वयोमर्यादा १८ ते ३५, किमान २ वर्ष तत्सम अनुभव)
सिव्हील इंजिनिअर ज्युनिअर*२*बीई सिव्हील (किमान २ वर्ष तत्सम अनुभव)
रिलेशनशिप मॅनेजर*१२*पदवीधर (वयोमर्यादा १८ ते २७)
(जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य)
--