पावसाळ्यातील साथ रोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य पथके

पावसाळ्यातील साथ रोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य पथके

साथीचे रोग प्रतिबंधासाठी आरोग्य पथके
काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन; विभागाद्वारे गाव भेटी, रुग्णांचे सर्व्हेक्षण
राजापूर, ता. २ : पावसाळ्यामध्ये फैलावणाऱ्या हिवताप, डेंग्यू, चिकनगुणिया यांसह अन्य किटकजन्य साथींना रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासह प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य पथके गठीत करण्यात येणार आहेत. पावसाळी साथींना गावच्या वेशीबाहेर अटकाव करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
साऱ्यांना मान्सूनचे वेध लागले असून येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या कालावधीमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुणिया यांसह अन्य किटकजन्य साथींचा गढूळ पाण्यामुळे फैलाव होतो. त्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून आतापासून नियोजन करण्यात आले असून त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये फैलावणाऱ्या विविध साथरोगांना गावच्या वेशीबाहेर रोखण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, विविध आजारांच्या साथींचा फैलाव होवू नये म्हणून लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.
या साथरोग पथकामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरातील गावांना वेळोवेळी भेटी देवून तेथील रुग्ण आणि परीसराचे सर्व्हेक्षण करून पाहणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणाला कुठल्या साथीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यास त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

चौकट
रोगांना रोखण्यासाठी काय करावे

घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा
एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये
आठवड्यातून किमान दोनवेळेस पाणीसाठे रिकामे करावेत.
टायर्स व निरुपयोगी, भंगार सामान घराबाहेर छतावर ठेवू नयेत
डासांना पळवून लावण्यार्‍या साधनांचा वापर करावा.
----------
चौकट
नऊ आरोग्य केंद्र सज्ज

तालुक्यातील ओणी, करक, फुपेरे, केळवली, सोलगाव, जैतापूर, जवळेथर, धारतळे, कुंभवडे या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग पथकाची स्थापना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राना दिल्या आहेत. या पथकामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य सहाय्यक आणि सहाय्यिका प्रत्येकी एक, आरोग्य सेवक आणि सेविका प्रत्येकी एक यांचा समावेश असणार आहे. त्यांच्या जोडीला शिपाई जोडीला असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com