तळवडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
तळवडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद

तळवडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद

sakal_logo
By

swt22.jpg
06485
तळवडेः रक्तदात्यांना प्रमाणपत्रे प्रदान करताना करताना मान्यवर.

तळवडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
‘सिंधू रक्तमित्र’चा पुढाकारः प्रकाश परब जन्मदिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे तसेच गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्यावतीने आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्यावतीने प्रकाश परब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रकाश परब संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी परब यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते तळवडे गावातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामध्ये नियमित रक्तदात्यांसोबतच विशेष करून युवराज ठाकूर, काशिराम कुंभार, अभिषेक नाईक, प्रकाश गावडे, मनोज मुळीक, जालिंदर परब, ओमकार नाईक, शुभम मालवणकर, ओमकार नाईक, साहिल परब, अनिकेत काजरेकर, गौरव मेस्त्री, मधुकर सावंत या युवकांनी रक्तदान केले.
यावेळी प्रकाश परब मित्रमंडळाचे अध्यक्ष रवींद्र सावंत, नारायण उर्फ राजू परब, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, उपसरपंच गौरव मेस्त्री, आपा परब, विलास परब, बाळू मालवणकर, विलास नाईक, अनिल जाधव, महेश परब, बाळू कांडरकर, निशा शिरोडकर, नमिता सावंत, श्री. घाडी, रवींद्र परब, सूरज डिचोलकर, दिनेश परब, संतोष राऊळ, तात्या परब, विजय मेस्त्री, प्राजक्ता गावडे, पंढरीनाथ मांजरेकर, उदय गावडे, बबन जाधव, उमेश आचरेकर, अभिषेक मेस्त्री, रघुनाथ काजरेकर, गोपाळ गावडे, भीमसेन नाईक, आबा रेडकर, सुनील परब, राजन कोरगावकर, संतोष गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष दीपक तारी, तालुका सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सहखजिनदार मधुकर उर्फ योगेश सावंत उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सावंत यांच्या हस्ते प्रकाश परब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन नारायण उर्फ राजू परब यांनी केले. आभार नमिता सावंत यांनी मानले.