रत्नागिरी-हातखंबा डेंजर स्पॉटने घेतले अकरा बळी

रत्नागिरी-हातखंबा डेंजर स्पॉटने घेतले अकरा बळी

फोटो ओळी
-rat२p१.jpg, rat२p१.jpg-KOP२३M०६४८KOP२३M०६४८२ रत्नागिरी ः हातखंबा येथील धोकादायक उतारावर झालेल्या भिषण अपघातांची छायाचित्र.
---------------

ग्राऊंड रिपोर्ट ....लोगो

हातखंबा डेंजर स्पॉटवरील उपाययोजना कुचकामी

सव्वा वर्षांतील नोंद ; अकरा बळी, चौपदरीकरणाची प्रतीक्षा

इंट्रो...

मुंबई-गोवा महामार्गावरील जिल्ह्यातील सर्वांत मोठा डेंजर स्पॉट बनला आहे तो हातखंबा गावातील तीव्र उतार. अवजड वाहनांचे या ब्लॅक स्पॉटवर वारंवार भिषण अपघात होत आहे. सव्वा वर्षांमध्ये या डेंजर स्पॉटनवर दहा प्राणांकित अपघात होऊन त्यामध्ये ११ जाणांचा जीव गेला आहे. रस्ता सुरक्षा समितीकडून वारंवार या स्पॉटवर सर्व प्रकारच्या सुधारणा करून झाल्या. तरीही अपघात रोखण्यात यंत्रणाच अपयशी ठरली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये या तीव्र उताराला फाटा मिळणार आहे.

--राजेश शेळके, रत्नागिरी


रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील वारंवार अपघात होणारे ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अजेंड्यावरील हा विषय आहे. आतापर्यंत १० ब्लॅकस्पॉटपैकी ६ स्पॉट हटवण्यात समितीला यश आले आहे. जिल्ह्यात आता फक्त ४ ब्लॅकस्पॉट राहिले आहेत. तेही हटवण्याच्यादृष्टीने यंत्रणा काम करत आहे. आरटीओंनी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी केलेली जनजागृती आणि ब्लॅकस्पॉट हटवण्यासाठी सर्व विभागांनी घेतलेली मेहनत यामुळे वर्षभरातील प्राणघातक अपघातांमध्ये ४० टक्के घट झाली आहे.
परंतु सर्वांत जास्त धोकादायक ठरला आहे, तो हातखंबा येथील तीव्र उताराचा ब्लॅक स्पॉट. या स्पॉटवर महिना ते पंधरा दिवसाला अपघात घडत आहेत. तीव्र उतार असल्याने वाहनधारक मुंबई-गोवा किंवा कोल्हापूर-रत्नागिरी येताना वेगाने या उताराणे उतरण्याचा प्रयत्न करतात आणि हे अपघात घडत आहेत. घाटमाथ्यावरून येणारे किंवा मुंबई, पुण्याहून येणाऱ्या वाहनचालकांना सरळसोट रस्त्यावर वाहन चालविण्याची सवय असते. रत्नागिरीतील नागमोडी वाळणाची त्यांना सवय नसल्याने जास्तीत जास्त अवजड वाहनांचे या धोकादायक उतारावर अपघात होत आहेत. चार दिवसांपूर्वीच एका खासगी आरामबसचा उतारावर अचानक ब्रेक निकामी झाला आणि चार ते पाच वाहनांना धडक देत घराच्या भिंतीवर बस आदळली.
त्यापूर्वी साखरेने भरलेल्या दोन ट्रकमध्ये अपघात झाला आणि दोन्ही ट्रकने पेट घेतला. एक ट्रक नियंत्रण सुटल्याने उलटून अपघात झाला होता. त्यानंतर स्टीलने भरलेला ट्रक दर्ग्याजवळील टेकडीवर आदळून मोठा अपघात झाला होता. हे स्टील केबिनवर घसरल्याने चालकाचा त्याखाली चिरडून मृत्यू झाला. असे अनेक भिषण अपघात या धोकादायक वळणावर झाले आहेत. रस्ता सुरक्षा समितीने तिथे स्पीड ब्रेकर टाकून पाहिले, मार्गदर्शक बोर्ड लावले, पट्टे मारले, अनेक उपाययोजना केल्या. परंतु अपघात रोखण्यास अपयश आले. संपूर्ण यंत्रणाच या धोकादायक उताराच्या उपाययोजनापुढे हातबल झाली आहे. आता चौपदरीकरणामध्ये या डेंजर उताराला फाटा मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण चौपदरीकरणाचा रस्ता मराठी शाळेच्या पाठीमागून जाणार आहे. २०२२ मध्ये ८ ते २०२३ मध्ये आजपर्यंत २ मरणांकीत अपघात झाल्याची नोंद आरटीओ कार्यालयात आहे.


कोट...
रस्ता सुरक्षा समितीसह स्थानिकांनी यामध्ये मार्गदर्शन करून अनेक उपाययोजना केल्या. परंतु हातखंब्यातील या तीव्र उतारावरील अपघात काही रोखू शकलेले नाहीत. आता काही उपायच शिल्लक राहिलेला नाही. चौपदरीकरणामध्ये या उतारालाच फाटा मिळणार आहे. मराठी शाळेच्या मागून रस्ता जाणार असल्याने आता वर्षभर येथे सतर्क राहणे हाच एक पर्याय आहे.
-महेश उर्फ बाबू म्हाप, स्थानिक आणि शिंदे सेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख
----
कोट
हातखंबा येथील डेंजर स्पॉटबाबत रस्ता सुरक्षा समितीने सर्व अहवाल नॅशनल हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. त्याता महामार्गावर स्पीडब्रेकरही टाकता येत नाही. त्यामुळे जो अहवाल दिला आहे, त्याप्रमाणे कार्यवाही होण्याची गरज आहे.
-जयंत चव्हाण, उप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com