पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये तन्वी पाध्ये प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये तन्वी पाध्ये प्रथम
पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये तन्वी पाध्ये प्रथम

पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये तन्वी पाध्ये प्रथम

sakal_logo
By

‘पैसा फंड’मध्ये तन्वी पाध्ये प्रथम
संगमेश्वरः व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल ९८.८६ टक्के लागला. या परीक्षेसाठी ८८ विद्यार्थ्यांपैकी ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तन्वी प्रशांत पाध्ये (९०.२८ टक्के), भूमी हर्षानंद चव्हाण (८८.६०), अश्विनी अजय शिंदे (८८) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
---------
नायशी विद्यालयाचा निकाल १०० टक्के
सावर्डेः नायशी येथील आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल सलग १७ व्या वर्षी १०० टक्के लागला. विद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये संयोगिता चव्हाण (९०.२० टक्के), आशिष सावंत (८८), तृप्ती चव्हाण (८७) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. संस्थेचे अध्यक्ष श्रीधर घाग, सेक्रेटरी प्रवीण खांडेकर, खजिनदार सुरेश आग्रे, शालेय समिती चेअरमन सुमित चव्हाण, संचालक किशोरराव घाग, कळंबुशी विकास सोसायटी चेअरमन गणपत शेठ चव्हाण, मुख्याध्यापक आनंदा घाटगे यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले.
---------
नवजीवनमध्ये सईदाखातून खान प्रथम
राजापूर : येथील नवजीवन हायस्कूलचा दहावीचा निकाल ९१.१७ टक्के लागला. ८८.४० टक्के गुण मिळवून सईदाखातून शमसुलक खानने प्रथम क्रमांक मिळवला. परीक्षेत ३४ विद्यार्थ्यांपैकी ३१ उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून शमसिया सलिम कोतवडकर (८७.४०), सानिया परवेज बारगीर (८५.६०) यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
-----------
राजापूर तालुक्याचा निकाल ९७.३१ टक्के
राजापूर : राजापूर तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९७.३१ टक्के लागला. परीक्षेसाठी तालुक्यातील ५३ माध्यमिक शाळांमधून १ हजार ८२६ विद्यार्थी बसले होते. पैकी १ हजार ७७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २७ माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. ४१८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी, ७७३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ४७८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
---------