कांदळगाव प्रशालेचा निकाल १०० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळगाव प्रशालेचा निकाल १०० टक्के
कांदळगाव प्रशालेचा निकाल १०० टक्के

कांदळगाव प्रशालेचा निकाल १०० टक्के

sakal_logo
By

कांदळगाव प्रशालेचा निकाल १०० टक्के
मालवण ः ओझर (ता.मालवण) विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून श्रेयस गावकर याने ३८५ गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला. तर निष्ठा कांबळी (३७७) हिने द्वितीय, हिमेश लाड (३७३) याने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सेक्रेटरी जी. एस. परब, तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सेक्रेटरी जी. एस. परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे आदींनी अभिनंदन केले.
------------
पोईप हायस्कूललाही यश
मालवण ः पोईप येथील सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून ग्रीष्मा प्रदीप धुरी (४५८) व रोशन मंगेश परब (४५८) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक सानिका यशवंत धुरी (४५४) हिने व तृतीय क्रमांक प्रणय प्रल्हाद माधव (४४६) याने मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपिनाथ पालव सर्व विद्यमान संचालक, प्राचार्य मुख्याध्यापक श्री. कुमार आदींनी अभिनंदन केले.