रत्नागिरी ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा
रत्नागिरी ः क्राईम पट्टा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

पान 3 साठी

मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा
रत्नागिरी ः त्रास देण्याच्या उद्देशाने घराचा दरवाजा तोडून नुकसान करून फिर्यादीच्या बहिणीचे अपहरण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुफियान सलीम शेख (वय २४, रा. भाट्ये मुरकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३१ मे रोजी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास शहरानजीक भाट्ये-मुरकरवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींना त्रास देण्यास सुरुवात केली. घराचा लाकडी दरवाजा तोडून नुकसान केले. तसेच वृद्धा घरात असताना फिर्यादीच्या बहिणीचे अपहरण केले. या प्रकरणी फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

चरवेलीतील तरुणीचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील चरवेली-नागलेवाडी येथील तरुणीला फिट आल्याने उपचारासाठी पाली आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धनश्री विजय कांबळे (वय २५, रा. चरवेली, नागलेवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना ३१ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. धनश्री दिव्यांग होती. तिला फिट आल्याने पाली येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी १ जूनला सकाळी सात वाजता दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी पावणेनऊच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

रत्नागिरीत लॉजवर एकाचा मृत्यू
रत्नागिरी ः शहरातील एका लॉजवर वास्तव्यास असणाऱ्या एकाचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना ३१ मे रोजी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मारुती आळी नाका येथील एका लॉजवर २५ मे पासून राजेंद्र वसंत बाणे (वय ५४, रा. सीजीएस कॉलनी, मुंबई) राहायला होते. ३१ मे रोजी रुममध्ये असताना त्यांचा कण्हण्यासारखा आवाज ऐकू आला. यावेळी खबर देणाऱ्याने जाऊन पाहिले असता राजेंद्र बाणे यांचे अंग गरम होते व काही हालचाल ते करत नव्हते. ही बाब लॉज मालकाला सांगून खासगी रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एटीएम फोडण्याचा प्रयत्न; संशयितांना कोठडी
रत्नागिरी ः शहराजवळील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कुवारबाव शाखेचे एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. सूरज अमर मोटे (वय २१, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व गिरीराज भजनलाल गुर्जर (वय २१, जि. सवाई म्हादुपूर, राज्य राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ३१ मे रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास बॅंक ऑफ महाराष्ट्र कुवारबाव शाखा येथे घडली होती. चोरट्यांनी धारदार हत्याराने एटीएम मशीन उचकटून एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला; परंतु पैसे मिळाले नाहीत म्हणून एटीएम मशीनचा दरवाजा व मशीनवरील कॅमेरा फोडून नुकसान करून पळ काढला होता. मात्र चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणी बॅंकेचे शाखा मॅनेजर कैलास महादेव रहाडे (३५, मुळ रा. बीड, सध्या रा. राजेंद्रनगर, थिबापॅलेस, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती. पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी (ता. २) न्यायालयाने चोरट्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.