वंदे भारतच्या स्वागतासाठी उत्सुक

वंदे भारतच्या स्वागतासाठी उत्सुक

वंदे भारतच्या स्वागतासाठी उत्सुक
रत्नागिरी, ता. २ः मोदी शासन विकास पर्वाची ९ वर्ष पूर्ण करत असताना वंदे भारत ही अत्यंत जलद व सुखावह ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर शनिवारी (ता. ३) दुपारी २ वाजता येणार आहे. वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरीकर बांधवांनी मोठ्या संख्येने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दुपारी २ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. सकाळी ११ वाजता गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वंदे भारत ट्रेन कोकणातून धावणार आहे. विकसित भारताचे चित्र अधिक स्पष्ट करणारी ही अद्यावत ट्रेन रत्नागिरीतील रेल्वे प्रवाशांसाठी सुखकर जलद प्रवासाचे साधन ठरणार आहे. नव्या युगाची अतिजलद सुखकारी ट्रेन मुंबई- गोवा मार्गावर धावताना रत्नागिरी येथे थांबा देण्यात आला असल्याने रत्नागिरीतील रेल्वे प्रवासी सुखावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com