Sat, Sept 30, 2023

नांदगाव येथील अपघातात एक गंभीर
नांदगाव येथील अपघातात एक गंभीर
Published on : 2 June 2023, 2:09 am
नांदगाव येथील अपघातात एक गंभीर
कणकवली, ता. २ः भरधाव वेगामध्ये जाणाऱ्या मोटरसायकलला रानटी डुकराची धडक बसल्याने एक जण गंभीर जखमी झाला. विकास म्हापसेकर (वय ४०, रा. कणकवली) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव कोळंबादेवी मंदिरासमोर घडला. अपघातातील गंभीर जखमी म्हापसेकर यांच्यावर गोवा येथे उपचार सुरू आहेत. याबाबत मोटरसायकल चालक मोहन विष्णू माने (वय ४७, रा. नांदगाव तिटा) यांनी खबर दिली. माने हे ग्रामसेवक आहेत. ते मोटरसायकलवरून (एम. एच. 07 1614) कणकवलीतून नांदगावला जात होते. त्याच्या गाडीवर पाठीमागे म्हापसेकर बसले होते. नांदगाव तिठ्या जवळ कोळंबादेवी मंदिरासमोर महामार्गावर रानटी डुक्कर आडवा आल्याने अपघात झाला.