कुडाळमधून कृष्णकांत अटकेकर प्रथम

कुडाळमधून कृष्णकांत अटकेकर प्रथम

06633
कृष्णकांत अटकेकर, राधिका तेरसे, वरद माईनकर, आदित्य नाईक


कुडाळमधून कृष्णकांत अटकेकर प्रथम

दहावीचा निकाल ९७.७०; २० शाळा ‘शत-प्रतिशत’

कुडाळ, ता. २ ः तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९७.७० टक्के लागला. तालुक्यातून परीक्षेत प्रविष्ट १७४५ पैकी १७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पणदूर हायस्कूलचा कृष्णकांत अटकेकर (९८.८०) याने तालुक्यात प्रथम, कुडाळ हायस्कूलची राधिका तेरसे (९८.२०) व वरद माईनकर (९८.२०) या दोघांनी द्वितीय, तर पाट हायस्कूलचा आदित्य नाईक (९७.८०) याने तृतीय क्रमांक पटकावला. तालुक्यातील २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
तालुक्यातील शाळांचा निकाल व अनुक्रमे प्रथम क्रमांक असेः कुडाळ हायस्कूल, कुडाळ (९६.२४)-राधिका तेरसे (९८.२०), व वरद माईनकर (९८.२०), अन्वय पाटकर (९७ टक्के), युतिका पालव (९६.८०), या प्रशालेचे ९० टक्केच्या वरील २३ विद्यार्थी असून संस्कृत विषयामध्ये शंभर टक्के यश मिळविलेले सात विद्यार्थी आहेत. पणदूर हायस्कूल (१०० टक्के)-कृष्णकांत अटकेकर (९८.८०), पियुषा सावंत (९७ टक्के), सेजल सुर्वे (९५ टक्के). सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ (९५.२३)-नेत्रा मुंडले व विवेक टेमकर (८६.८०), साक्षी आसोलकर (८६.००), मिथुन हळदणकर (८५.४०). शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूल (१०० टक्के)-श्रावणी नारकर (९३.८०), राखी देसाई (९१.८०), शिवानी गुरव व केतन कदम (८८.२० टक्के). आवळेगाव हायस्कूल (१०० टक्के)-सोनाली धुमाळे (९२.२०), धनश्री कुपेरकर (९१.२०), हेतल (८६.६०). डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस (१०० टक्के)-रेशम सावंत (९४.२०), हरिशा पवार (९३.२०), दीक्षा परब (९२.८०). श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर (१०० टक्के)-शुभांगी नेवगी (९०.४०), जयेश मार्गी (७८.६०), प्रिया नेरुरकर (७५.४०). शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स् व सायन्स जांभवडे (१०० टक्के)-दीक्षा गोवेकर (९५ टक्के), कोमल सावंत (९१ टक्के), अश्विनी काजरेकर (८९.४०). बिबवणे लक्ष्मी नारायण विद्यालय (९६.४१)-तन्वी लुडबे (९७ टक्के), समृद्धी पिंगुळकर (८७.८०), पारस गावडे (८३ टक्के). डॉन बॉस्को हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा (१०० टक्के)-शर्विल बागवे (९७ टक्के), सानिका सावंत (९६ टक्के), सोहम लाड (९५.६०). शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव (९६.२२)-मधुकर तेंडोलकर (९३.२०), श्रेया तामाणेकर (९०.८०), रुचिरा चव्हाण (८९.२०). माध्यमिक विद्यालय नेरुर माड्याचीवाडी (१०० टक्के)-प्रणया केरकर (९४ टक्के), मिताली गावडे (९०.८०), नूतन परब (८१ टक्के). वालावल हायस्कूल (१०० टक्के)-जयेश प्रभू (९४.८०), आरती कोनकर (९१.४०), भूमिका मेस्त्री (९१.२०). चेंदवण हायस्कूल-उन्मेश नाईक (९३.६०), विराज वावकर (९३.४०), बाळकृष्ण ठुंबरे (९३.२०).
ओरोस हायस्कूल-कमल परुळेकर (९५.८०), तानिया धुरी (९२.४०), प्रवीण सानप (९०.६०). नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल (१०० टक्के)-जयेश प्रभू (९४.८०), आरती कोनकर (९१.४०), भूमिका मेस्त्री (९१.२०). श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव (९५.८०)-साहिल गावडे (९३.८०), शर्वरी काशीद (९२.६०), प्रणवी पाटकर (९२.४०). न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुर (१०० टक्के)-श्रद्धा राऊळ (९५.२०), नारायण सावंत (९४ टक्के), विघ्नेश खंदारे (९२.२०). एस. एल. देसाई विद्यालय पाट (९६.४२)-आदित्य नाईक (९७.८०), समीक्षा तेजम (९६.४०), पार्थ गोसावी (९६ टक्के).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com