थेराडेना निवडून आणण्याची जबाबदारी आजही

थेराडेना निवडून आणण्याची जबाबदारी आजही

फोटो ओळी
- rat२p१५.jpg-KOP२३M०६५६३ रत्नागिरी- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांच्या वाढदिवसाच्या भव्य कार्यक्रमात बोलताना चिपळुणचे आमदार शेखर निकम. सोबत संतोष थेराडे यांच्यासह अन्य मान्यवर.
-------------

थेराडेंना निवडून आणण्याची जबाबदारी आजही

शेखर निकम ; आमदाराला लाजवेल, असा भव्य वाढदिवस

रत्नागिरी, ता. २ : राजकारण हे राजकारणापुरते मर्यादित हवे. इतरवेळी संबंध नेहमी जपले पाहिजे, ही शिकवण गोविंदराव निकम यांनी दिली आहे. थेराडे आता मी कुठेही जाणार नाहीत, काळजी करू नका. थेराडेंना निवडून आणण्याची जबाबदारी तेव्हाही होती आणि पुन्हा सांगतो आजही आहे. कारण आता महाविकास आघाडी अधिक मजबूत होत आहे. कडवईत गटात काही कमी जास्त झाले तर सावर्डेतून तुम्हाला उभा करू. परंतु तुम्हाला जिल्हा परिषदेला पाठवणारच, असा शब्द शेखर निकम यांनी दिला.
कडवई येथे संतोष थेराडे यांचा वाढदिवस त्याच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. या वेळी ते बोलत होते. निकम म्हणाले, कडवई (ता. संगमेश्वर) गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे चांगले कार्यकर्ते आहेत. आपल्या नेत्याबद्धल आणि पक्षाबद्धल असलेली निष्ठा आणि प्रेम हे त्यांच्याकडून शिकावे. आज कोणते पद नाही, तरी एखाद्या आमदाराला लाजवेल, असा वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. आपल्या पक्षाशी असलेली निष्ठा महत्त्वाची. आता वर्षाचा कालावधी राहिला आहे. थेराडे तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. आता विकास कामे होत नाहीत किंवा निधी दिला जात नाही. परंतु काळजी करू नका आमच्या आमदार निधीतून आणि खासदार निधीतून आपली विकासाची गाडी ढकलत नेऊ. आता एक वर्षच राहिले आहे. पुढे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. महाविकास आघडी एकसंघ होऊन काम करते त्याचा आदर्श आज या कडवई गटाने दाखवून दिला, असे कौतुकही निकम यांनी केले. या वेळी राजन सुर्वे, सुरेश भायजे, कुवळेकर आदी पदाधिकारी, सरपंच, शाखाप्रमुख, गावकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


चौकट
तुमचे प्रेम पाहून मन भरून आले
माझा वाढदिवस एवढा भव्य करणारी ही माझी जिवाभावाची माणसं आहेत. त्यांचे प्रेम पाहून आज मन भरून आलं. एकही फोन न करता कोणते निमंत्रण नसताना तुम्ही आलात त्याबद्धल मी तुमचा आभारी आहे. परमेश्वर पहावा तो माणसामध्ये पहावा, आपण परमेश्वरासारखे मला भेटलेला आहात. धन्यवाद व्यक्त करतो, अशा शब्दात थेराडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उद्धव ठाकरेंना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे याचा सुड आपण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत घ्यायचा आहे, असे त्यांनी बजावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com