वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.१२ टक्के

वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.१२ टक्के

06660
परी सामंत, प्रतीक्षा नाईक, सानिका सावंत, तृषा वारंग

वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.१२ टक्के

सामंत, नाईक प्रथम; ६८६ पैकी ६८० विद्यार्थी उत्तीर्ण

वेंगुर्ले, ता. २ ः माध्यमिक शालांत दहावी परीक्षेत तालुक्यातून परीक्षेला बसलेल्या एकूण ६८६ विद्यार्थ्यांपैकी ६८० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.१२ टक्के निकाल लागला. अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे हायस्कूलची परी सामंत व न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची प्रतीक्षा नाईक या दोघींनी ९८.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. वेंगुर्ले हायस्कूलच्या सानिका सावंत हिने ९७.४० टक्के गुणांसह द्वितीय, अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळेची तृषा वारंग हिने ९६.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तालुक्यात एकूण १९ शाळांपैकी १७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
तालुक्यातील शाळांचा निकाल व प्रथम तीन क्रमांक असेः दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली (१०० टक्के)-संजना दाभोलकर (८७.८०), वैभवी कांबळी (८७ टक्के), दिशा कोनकर (८० टक्के). वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले (१०० टक्के)-सानिका सावंत (९७.४०), विधी वजराटकर (९३.२०), प्रतीक कारेकर (९२.८०). आर. के. पाटकर हायस्कूल (१०० टक्के)-साईराज बागुल (९३.२०), प्रथमेश जोशी (९१.४०), गायत्री मांजरेकर (९१ टक्के). न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा (१०० टक्के)-प्रतीक्षा नाईक (९८.२०), रुचिरा बागायतकर व संस्कृती नाईक (९५.२०), पूर्वा राजाध्यक्ष व रुचा माणगावकर (९४.२०). सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल (१०० टक्के)-चिन्मयी आंगचेकर (९३.६०), चैताली नवार (९३ टक्के), परिमल नाईक (९२.४०), चिन्मय मराठे (९२.४०). मदर तेरेसा स्कूल (१०० टक्के)-लक्षणा नाबर (९३.२०), संस्कृती मांजरेकर (९२.४०), रेवा तोरस्कर (९२ टक्के). न्यू इंग्लिश स्कूल मातोंड (९३.७५)-श्रद्धा नेमण (८६.६०), रुची मोहिते (८३.२०), देवदास परब व कुणाल कोंडये (८१.८०). अणसूर-पाल हायस्कूल (१०० टक्के)-ऋतुजा आमडोसकर (९४.४०), सानिया पालकर (९२.८०), दिव्यश्री परब (८८.२०). शिवाजी हायस्कूल, तुळस (१०० टक्के)-सानिका नागवेकर (८८ टक्के), सानिका माळकर (८७.८०), धनश्री पायनाईक (८३ टक्के). श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे (१०० टक्के)-मेघन नाईक (९२.२०), साक्षी सोन्सूरकर (९२ टक्के), ओजस परब व साईश येरम (९०.६०). रा. धो. खानोलकर हायस्कूल, मठ (१०० टक्के)-रसिका ठाकूर (८६.२०), दीपिका परुळेकर (८४.८०), ईशा ठाकूर व पूर्वा शेडगे (८२.६० टक्के). कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली (१०० टक्के)-सानिका डिचोलकर (९३.६०), भूषणा धरणे (९२.८०), वृषाली परब (९१.४०). अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा (९४.११)-संघवी जाधव (९०.८०), वीणा फेंद्रे (९०.४०), मैथिली गावडे (८९ टक्के). श्री माऊली विद्यामंदिर, रेडी (१०० टक्के)-सिमरन राणे (८५.२०), साक्षी कांबळी (८२.६०), श्रुती गवंडी (८१.६०). श्री सरस्वती विद्यामंदिर, आरवली टांक (१०० टक्के)-सेजल भुबे (९३.८०), सृष्टी पेडणेकर (८९.४०), सुहानी भुबे व कृतिका भानजी (८८.४०). आसोली हायस्कूल, आसोली (१०० टक्के)-दिया धुरी (९३.४०), कृष्णा आरोसकर (९०.२०), नीरज टाककर (८९.६०). स. का. पाटील केळूस (१०० टक्के)-मानसी केळुसकर व सिद्धी वराडकर (९२ टक्के), सिद्धी परब (९०.२०), डॉली धारगळकर (८९.४०). अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे (१०० टक्के)-परी सामंत (९८.२०), तृषा वारंग (९६.४०), हर्षली परुळेकर (९५.८०). मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी (१०० टक्के)-स्फूर्ती तिवरेकर (८८.४०), चांगुणा पाटील (८७.८०), गार्गी डुबळे (८७.२०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com