‘उद्धट अधिकाऱ्याची बदली करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उद्धट अधिकाऱ्याची बदली करा’
‘उद्धट अधिकाऱ्याची बदली करा’

‘उद्धट अधिकाऱ्याची बदली करा’

sakal_logo
By

‘उद्धट अधिकाऱ्याची बदली करा’

कुडाळातून मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधी, नागरिकांनी शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव अग्रवाल यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या. या पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांना वाईट अनुभ येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यावर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पोलिस अधीक्षकांकडे करत तसे न झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही दिला.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, सरंबळसरपंच रावजी कदम राजन नाईक योगेश नाईक आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या संबंधित अधिकाऱ्याची वागणूक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेशी उद्धट स्वरुपाची असल्याचे दिसून येते. सरकारी कामात अडथळा, ३५३ दाखल करण्याची धमकी ते सर्वांना देत असतात. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी हॉटेल कृष्णा सागर येथे गोवा बनावटीची दारू पकडली होती, त्यावेळी गुन्हा न दाखल करता परस्पर दारूची विक्री करण्यात आली. हे प्रकरण वृत्तपत्रात आल्यानंतर मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे तहसीलदारांनी केलेल्या एका तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्हामध्ये तालुक्यातील अनेकांना फोन करून आपले नाव गुन्ह्यात आहे, असे सांगून त्यांच्याकडून वसुली करण्यात आली. काही प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतरही फिर्यादी अथवा आरोपींना बोलावून त्यांना त्रास देण्याचे काम सातत्याने संबंधित अधिकाऱ्याकडून होत आहे. सरंबळचे (ता.कुडाळ) सरपंच रावजी कदम यांना धमकावून व धक्का देत कोठडीकडे नेऊन एका कोपऱ्यात उभे राहा; अन्यथा आत टाकणार, अशी धमकी दिली. कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांना सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करू, असे सांगितले. तर गुरुवारी (ता. १) मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी फिर्यादीची एफआयआर दाखल करून घ्या, अशी विनंती केली असता त्यांनाही तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. अशा उद्धट व बेशिस्त अधिकाऱ्याची तात्काळ तालुक्याबाहेर बदली करावी, अशी मागणी निवेदनातून केल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिली.
--
कोट
कुडाळ येथील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांबाबत स्थानिकांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल.
- सौरव अग्रवाल, पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग