
भिडे क्लासेसचे सुयश
rat३p१६.JPG
०६७३३
चिपळूणः दहावीच्या परीक्षेत गुणवंत वेदांत दुधाणेसोबत मोहन भिडे, संजय दुधाणे.
----------------------
दहावीच्या परीक्षेत
भिडे क्लासेसचे सुयश
चिपळूण, ता. ३ः येथील भिडे क्लासेसद्वारे ऑनलाईन अभ्यास करत दहावीच्या शालांत परीक्षेत आर्चरी खेळाडू वेदांत दुधाणे याने ९४ तर वरद म्हसकर ७४ टक्के गुणांची कामगिरी केली आहे.
चिपळूण जन्मभूमी असलेला वेदांत संजय दुधाणे हा पुण्यातील गोळवलकर शाळेचा विद्यार्थी होता. आर्चरी खेळामुळे तो नियमित शाळेत जाऊ शकत नव्हता. यामुळे चिपळूण येथील मोहन भिडे यांच्या ऑनलाईन क्लासद्वारे अभ्यासाचा मार्ग वेदांतने शोधला. आर्चरीचा सराव करून आल्यानंतर संध्याकाळी भिडे सर हे वेदांतचा ऑनलाईन अभ्यास घेत असे. भिडे सरांच्या शिकवण्यामुळे वेदांत ९४ टक्के गुण मिळवून दहावीत उत्तीर्ण झाला आहे. वेदांत हा आर्चरी खेळाचा राष्ट्रीय खेळाडू असून, त्याने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत ६० पदके जिंकली आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर वेदांतचा मोहन भिडे यांनी क्लासमध्ये पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. या प्रसंगी त्याचे वडील संजय दुधाणे उपस्थित होते.
दादरा नगर हवेलीमधील सिल्वासा शहरातील वरद म्हसकर या सीबीएससीच्या विद्यार्थ्याने भिडे सरांकडे ऑनलाईन अभ्यास करून ७४ टक्के गुण प्राप्त केले आहे. तो सहामही परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता. त्यानंतर त्याची आई अंजली बेहेरे यांनी भिडे सरांशी संपर्क साधला. वरद म्हसकरने ऑनलाईन अभ्यास करून अभ्यास यश संपादन केले आहे. मला गणित आणि सायन्सची खूप भिती होती; मात्र भिडे सरांनी मूलभूत संकल्पनेद्वारे अभ्यास करून घेतल्यामुळे अनपेक्षित असे गुण मला मिळाले आहेत, असे वेदांत दुधाणे याने सत्कारानंतर सांगितले.