जोडे मारो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोडे मारो आंदोलन
जोडे मारो आंदोलन

जोडे मारो आंदोलन

sakal_logo
By

06735


खासदार राऊत यांच्या
त्या वक्तव्याचा निषेध
कणकवली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन
कणकवली, ता. ३ : खासदार संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच पत्रकार परिषदेमध्ये थुंकण्याच्या प्रकार केला. या घटनेचा आज कणकवली शिवसेना (शिंदे गट) कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी दुपारी अकरा वाजता शिवसेना कार्यालयासमोर संजय राऊत यांची प्रतिमा असलेला बॅनर हातात घेऊन, त्यावर जोडे मारो आंदोलन केले. राऊत यांच्या त्‍या कृतीचाही निषेध व्यक्‍त केला. आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, संदेश पटेल, भास्कर राणे, नीलेश तेली, सुनील पारकर, बाळू पारकर आदी सहभागी झाले होते.