दिगवळे येथील रस्त्याचे लोकार्पण

दिगवळे येथील रस्त्याचे लोकार्पण

06743
दिगवळे : येथील रांजणवाडी ते स्वयंभू मंदिर रस्त्याचे लोकार्पण सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

दिगवळे येथील रस्त्याचे लोकार्पण
कणकवली, ता. ३ : दिगवळे रांजणवाडी (ता. कणकवली) ते स्वयंभू मंदिर या रस्त्याचे लोकार्पण आज शिवसेना जिल्‍हाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्‍हा संघटक सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी सरपंच संतोष घाडीगावकर, शिवसेना विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवासेना विभागप्रमुख संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे, शामसुंदर जाधव, स्वयंभू देवस्थान समितीचे अध्यक्ष नाना गावडे, संदीप चव्हाण बुवा आदी उपस्थित होते.
दिगवळे रांजणवाडी हा अडीच किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय झाला होता. शिवसेना पदाधिकारी तसेच सरपंच घाडीगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे यंदा या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. दरम्‍यान, या रस्त्याला लागून स्वयंभू मंदिरकडे जाणारा ५० मीटरचा रस्ता शासनाकडून मंजूर झाला नव्हता; मात्र ठेकेदार रामदास विखाळे यांनी हा रस्ता स्वखर्चातून करून दिला. त्‍याबद्दल त्‍यांचाही गावच्यावतीने सत्कार करण्यात आला. मुख्य रस्त्याचे उद्‌घाटन सतीश सावंत यांच्या हस्ते, तर स्वयंभू मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्‍घाटन सुशांत नाईक यांनी केले. डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे दिगवळेवासीयांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com