
दोडामार्ग तालुक्याचा निकाल ९८.३६ टक्के
06623
अथर्व गवस, प्रणिता पालवे, वेदिका नाईक
दोडामार्ग तालुक्याचा निकाल ९८.३६ टक्के
दहावीची परीक्षा; अथर्व गवस प्रथम, प्रणिता पालवे द्वितीय
दोडामार्ग, ता. २ ः तालुक्याचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९८.३६ टक्के लागला. तालुक्यातून एकूण ३६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूलचा अथर्व गवस याने ९५ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. याच प्रशालेची प्रणिता पालवे हिने ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर दोडामार्ग इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी वेदिका नाईक हिने ९४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे. तालुक्यातील माध्यमिकच्या एकूण १६ शाळांपैकी १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. सर्व प्रशालांतून एकूण ३६६ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यातील ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील शाळानिहाय अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणेः सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कुडासे (१०० टक्के)- श्रेया सांगुर्डेकर (८८.६०), सोनम जंगले (८५.८०), पल्लवी सिन्नारी (८२.२०). शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे (१०० टक्के)-प्राजक्ता गवस (८७ टक्के), अदिती नाईक (८२.६०), गौरी नाईक आणि गायत्री गवस (८०.४०) टक्के. कीर्ती विद्यालय घोटगेवाडी (१०० टक्के)-कुंदा धुमास्कर (८६.८०), तन्मय दळवी (७९.८०), मनीष देसाई (७५.४०). बापूसाहेब देसाई विद्यालय उसप (१०० टक्के)-नंदा गवस (९४ टक्के), अंतरा रेडकर (८५ टक्के), सलोनी केरकर (८४.८०). माध्यमिक विद्यालय झरेबांबर (९६.६६)-कृपाली गवस (८०.६०), गौरवी गवस (८०.४०), औदुंबर नाईक (७८.४०). समाजसेवा हायस्कूल कोलझर (१०० टक्के)-जयेश देसाई (९१.६०), प्रगती गवस (८८.२०), मिथिला कोल्टा (८८ टक्के). माध्यमिक विद्यालय सोनावल (१०० टक्के)- सोनल झोरे (९१.६०), गौरी नाईक (८६ टक्के), नूतन च्यारी (८४ टक्के). नूतन विद्यालय कळणे (१०० टक्के)-पूर्वा परब (९२ टक्के), विघ्नेश गवस (८७ टक्के), यष्मीता पिळणकर (८६.६०). नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी (१०० टक्के)-संकेत पर्येकर (८४ टक्के), जाई पर्येकर (८०.४०), संजना येळुस्कर (७८.४०). माध्यमिक विद्यालय झोळंबे (१०० टक्के)-अश्वेक गवस व जयश्री राऊळ (८१.४०), सानिया झोळंबेकर (८० टक्के), रविना देसाई (७४.८०). दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग (९६.२२)-वेदिका नाईक (९४.४०), मृदुला देसाई (९१.४०), सृष्टी देसाई (८९ टक्के). एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा (१०० टक्के)-तनिष्का केसरकर (८८.६०), सोहम लोंढे (८७.६०), प्रताप लोंढे व राहुल सावंत (८७ टक्के). न्यू इंग्लिश स्कूल भेडशी (९७.५६)-अनुज शिंदे (८७.०७), सौम्या मणेरकर (८४.४०), साक्षी घोगळे (८३.८०).
--
इतर शाळांचा निकाल असा
माध्यमिक विद्यालय माटणे (९० टक्के)-अभिजीत पिरणकर (८८ टक्के), गौतमी गवस (८२.४०), संध्या वरक (८० टक्के). करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली-भेडशी (१०० टक्के)-अथर्व गवस (९५ टक्के), प्रणिता पालवे (९४.६०), दत्ताराम सावंत (८८.२०). माध्यमिक विद्यालय मांगेली (१०० टक्के)-सर्वेश मोरगावकर (९३ टक्के), विठ्ठल गवस (७८.४०), सविता गवस (७५.६०).