आधार प्रमाणीकरणसाठी आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधार प्रमाणीकरणसाठी आवाहन
आधार प्रमाणीकरणसाठी आवाहन

आधार प्रमाणीकरणसाठी आवाहन

sakal_logo
By

आधार प्रमाणीकरणसाठी आवाहन

उपनिबंधक; कर्जमुक्ती योजनेबाबत सूचना

ओरोस, ता. ३ ः महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी उद्यापर्यंत (ता. ४) आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक मंगेश सांगळे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागामार्फत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना २९ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ हजार २२४ खातेदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यातील १५ हजार ७१८ खातेदारांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पैकी १४ हजार १४९ खातेदारांच्या खात्यात ४३ कोटी ६६ लाख एवढी रक्कम सहकार विभागाकडून जमा करण्यात आली आहे. तर अद्याप ५०३ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १७३ खातेदार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे ५२ खातेदार तसेच राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे २७८ खातेदार आहेत. या खातेदारांनी ४ जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. तसेच संबंधित बँकांनी आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक असलेल्या खातेदारांशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक सांगळे यांनी केले.