संत गोरा कुंभार पतसंस्थेचा आज रौप्यमहोत्सवी कार्यक्रम

संत गोरा कुंभार पतसंस्थेचा आज रौप्यमहोत्सवी कार्यक्रम

संत गोरा कुंभार पतसंस्थेचा
आज रौप्यमहोत्सवी कार्यक्रम
चिपळूण, ता. ३ः तालुक्यातील खेर्डीतील संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम रविवारी (ता. ४) सकाळी अकरा वाजता संत शिरोमणी गोरोबा काका सभागृहात होणार आहे.
संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली. अतिशय नियोजनबद्ध आखणी करत कुंभार समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी सुभाष गुडेकर, प्रकाश साळवी आणि इतर पदाधिकारी यांनी या पतसंस्थेला आकार देत सक्षम बनवण्याचे काम केले आहे. यामध्ये सर्व समाजातील समाजबांधवांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. पतसंस्थेच्या वतीने नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी संस्थेने मोठे योगदान दिले आहे.
रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रोहिदास बांगर, कुंभार समाजाचे महाराष्ट्र महासंघ अध्यक्ष सतीश दरेकर, कार्याध्यक्ष महेश सायकर, पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सोमवंशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कुंभार, प्रदेश उपाध्यक्ष वसंत घोडनदीकर, प्रदेश सरचिटणीस विलास गुडेकर, के. ई. एम. हॉस्पिटल मुंबईचे डॉ. सुरेश काळे, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष अनंत कुंभार, कोकण विभाग अध्यक्ष राजेंद्र मांगरूळकर, सामाजिक कार्यकर्ते, डॉ. पी. व्ही. कुंभार, पारंपरिक व्यवसाय आघाडी अध्यक्ष प्रकाश भालेराव, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजय वीरकर, कुंभार समाज महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रसिका खेडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com