Wed, Sept 27, 2023

जंगम, जाधव यांना पुरस्कार
जंगम, जाधव यांना पुरस्कार
Published on : 3 June 2023, 2:14 am
06764
कलंबिस्त ः सरपंच सपना सावंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मीनल जंगम.
जंगम, जाधव यांना पुरस्कार
सावंतवाडी ः सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार कलंबित ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसंघ अध्यक्ष हिरकणी प्रभाग संघ कृषी अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य मीनल जंगम आणि कविता जाधव यांना देण्यात आला. सरपंच सपना सावंत यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी ग्रामसेवक बापूसाहेब फुंदे, अंगणवाडी सेविका मनीषा बिड्ये, वंदना पास्ते, स्नेहा पवार, चैताली राऊळ आदी उपस्थित होते.