
संजय राऊतांविरोधात सावंतवाडीत आंदोलन
06835
सावंतवाडी ः शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अशोक दळवी, बबन राणे, बाबू कुडतरकर आदी.
संजय राऊतांविरोधात सावंतवाडीत आंदोलन
सावंतवाडी, ता. ३ ः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात येथील शिवसेनेने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर ‘जोडे मारो’ आंदोलन छेडले. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी व तालुका प्रमुख बबन राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेमार्फत हे आंदोलन केले. यावेळी जिल्हाप्रमुख दळवी, तालुकाप्रमुख राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, गुंडू जाधव, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, आबा केसरकर, प्रकाश गावडे, दया परब, गजानन नाटेकर, शशिकांत गावडे, नंदू शिरोडकर, अब्जू सावंत, संदेश सोनुर्लेकर, सुरेंद्र बांदेकर, संजय माजगावकर, बापू कोठावळे, राजन परब, लाडू जाधव, संजय गावडे, एकनाथ हळदणकर, नरेंद्र मिठबावकर आदी उपस्थित होते.