‘कौशल्य विकास’तर्फे उद्या कुडाळमध्ये रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कौशल्य विकास’तर्फे उद्या
कुडाळमध्ये रोजगार मेळावा
‘कौशल्य विकास’तर्फे उद्या कुडाळमध्ये रोजगार मेळावा

‘कौशल्य विकास’तर्फे उद्या कुडाळमध्ये रोजगार मेळावा

sakal_logo
By

‘कौशल्य विकास’तर्फे उद्या
कुडाळमध्ये रोजगार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः खासगी क्षेत्रातील कारखाने, उद्योजक, व्यापार, दुकाने, शॉप्स व अन्य व्यवसायांना सद्यःस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतगर्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कुडाळ येथे मंगळवारी (ता. ६) सकाळी दहाला आयोजित केला आहे. केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी ही माहिती दिली.
रोजगार मेळाव्यामध्ये कार्पेंटर २५ जागा, (शैक्षणिक अर्हता आयटीआय, वयोमर्यादा १८ ते ३५, अनुभव किमान १ वर्ष). असिस्टंट कार्पेंटर २५ जागा (दहावी उत्तीर्ण, वयोमर्यादा १८ ते ३५, किमान २ वर्षे तत्सम अनुभव), सिव्हिल इंजिनिअर ज्युनिअर २ जागा (बीई सिव्हिल, किमान २ वर्षे तत्सम अनुभव), रिलेशनशिप मॅनेजर १२ जागा (पदवीधर, वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे), सेल्समन-मॅकनिक १२ जागा (बारावी उत्तीर्ण, आयटीआय, वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे). ट्रेनिफिटर-वेल्डर ८० जागा (दहावी व बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा ग्रॅज्युएट-पोस्ट ग्रॅज्युएट, वयोमर्यादा १८ ते २८), टूल आणि डायमेकर, प्रेस ऑपरेटर, फिटर, वेल्डर, हेल्पर अशा एकूण १७० जागा (शिक्षण अट दहावी व बारावी, आयटीआय, वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे). जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे.