कणकवलीत गुणवंतांचा सत्कार

कणकवलीत गुणवंतांचा सत्कार

06918
कणकवली ः दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे. शेजारी मेघा गांगण, अभिजित मुसळे, संजय कामतेकर, किशोर राणे, अण्णा कोदे आदी. (छायाचित्र ः प्रथमेश जाधव)

कणकवलीत गुणवंतांचा सत्कार
कणकवली ः शहरातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाला. यामध्ये कणकवलीतील श्रावणी शिखरे (९८ टक्के), सृष्टी जोगळे (९६.४० टक्के) गुण मिळवत गुणवत्ता यादीत आल्या. त्यासोबतच दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या स्वानंदी कोदे, आर्या डेगवेकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीवल्लभ शिखरे व त्यांचे कुटुंबीय तसेच माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी नेते अबीद नाईक, रवींद्र गायकवाड, संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, मेघा गांगण, बंडू गांगण, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेंद्र मुरकर, किशोर राणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com