Sat, Sept 30, 2023

सती हायस्कूलचा दहावीचा निकाल 100%
सती हायस्कूलचा दहावीचा निकाल 100%
Published on : 5 June 2023, 10:07 am
सती हायस्कूलचा दहावी निकाल १०० टक्के
चिपळूण, ता. ५ः दहावीच्या परिक्षेत धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मिडीयम स्कूल खेर्डी चिंचघरी सती विदयालयाने घवघवीत यश संपादन केले. विदयालयाचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक नेहा निलेश कदम (९० टक्के), व्दितीय क्रमांक मंथन सातेरी पाटील (८७ टक्के), तृतीय क्रमांक राम सुभाष कदम (८६.६० टक्के) यांनी पटकावले. १७ विदयार्थी विशेष योग्यता क्षेत्रामध्ये, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, ३ विद्यार्थी व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा पिटले व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडीक यांनी अभिनंदन केले.